Hingoli Assembly Election 2024  Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli Assembly Election 2024 : हिंगोलीत कॉंग्रेस बालेकिल्ला राखणार की भाजप हॅट्रिक करणार ? मतदारसंघात सध्या काय आहे परिस्थिती?

Hingoli Assembly Constituency Election Mahavikas Aghadi Vs Mahayuti: हिंगोलीत विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झालीय. आज आपण हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये काय चित्र आहे, हे जाणून घेवू या.

Rohini Gudaghe

मुंबई : हिंगोली विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. पण २०१९ पेक्षा यंदाची निवडणूक वेगळी असेल. कारण, महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट टक्कर होणार आहे. त्यात बंडखोरांची भूमिकाही तितकीच महात्वाची असेल. हिंगोली लोकसभा मतदारसंघ मविआकडे आहे. त्यामुळे आता हिंगोली विधानसभा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीकडूनही जोरदार पराकाष्ठा केली जाईल. भाजपकडूनही विजयाची खात्री देण्यात येत आहे. त्यामुळे यंदा हिंगोली विधानसभा रंगतदार होईल, यात शंकाच नाही. पण त्याआधी आपण हिंगोली विधानसभेचं गणित, इतिहास सर्वकाही जाणून घेऊयात..

हिंगोली विधानसभा मतदारसंघाचं राजकारण हे सर्वच जातीवर अवलंबून असल्याचं पाहायला मिळतंय. या मतदारसंघांमध्ये १९५५ पासून आतापर्यंत केवळ एक वेळा ओबीसी समाजाचा उमेदवार विजयी झाला होता. आजपर्यंत बाकी सर्व आमदार हे मराठा समाजाचे झालेले आहेत. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत आता हिंगोलीत होणार आहे. जिल्ह्यातील हिंगोली आणि कळमनुरी या दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा बोलबोला होता, तर वसमतमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. पण २०१४ साली झालेल्या निवडणुकीमध्ये परिवर्तन झाल्याचं बघायला (Hingoli Assembly Election 2024) मिळालंय.

हिंगोली विधानसभा मतदारसंघात सध्या काय चित्र?

हिंगोली विधानसभा मतदारसंघ कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, मागील दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघात भाजपने आपलं वर्चस्व स्थापित केलंय. तानाजी मुटकुळे यांच्या रूपाने दोन वेळा भाजपचा हिंगोली विधानसभेवर झेंडा फडकला आहे, हिंगोली विधानसभेत मागील काही निवडणुकात सलग पंधरा वर्ष काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर हे आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हा बालेकिल्ला पुन्हा काँग्रेस भाजपकडून खेचून घेणार की? भाजप या मतदारसंघात हॅट्रिक करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघ

हिंगोलीत लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला (Mahavikas Aghadi Vs Mahayuti) मिळाली. निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर ४,९२,५३५ मतं मिळवून विजयी झालेत. शिंदे गटाचे बाबुराव कोहळीकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला १,६१,८१४ मतं मिळाली होती. सध्या हिंगोली लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे विरूद्ध शिंदे गट असा सामना रंगला (Vidhan Sabha Election) होता. यावेळी चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. 'वंचितने एकला चलो रे'ची भूमिका घेतली होती. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर 'गद्दार विरुद्ध खुद्दार' असा प्रचार देखील निवडणुकीत रंगला होता.

२०१९ चा विधानसभा निवडणूक निकाल

हिंगोली विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार तानाजी मुटकुळे यांनी विजयाचा गुलाल उधळला होता. ते ९५. ३१८ मतं मिळवून विजयी झाले (BJP Tanaji Mutkule Against Congress Bhaurao Patil) होते. तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार पाटील भाऊराव बाबुराव पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यामुळे हिंगोली विधानसभेवर भाजपचं वर्चस्व निर्माण झालं होतं.

२०१४ चा विधानसभा निवडणूक निकाल

२०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालामध्ये भाजपने बाजी मारली होती. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपमध्ये चौरंगी लढत झाली होती. यामध्ये भाजप उमेदवार तानाजी सखाराम मुटकुळे यांचा दणक्यात विजय झाला होता. त्यांना ९७,९४५ मतं २०१४ च्या निवडणुकीत मिळाली होती. तर कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. हिंगोली विधानसभेत कॉंग्रेसचा बोलबाला होता. परंतु भाजपनं २०१४ मध्ये कॉंग्रेसला धूळ चारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच संपला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

Pushpa 2 Actor News: पुष्पा चित्रपटाचा स्टार अभिनेता अडचणीत! महिलेने केले लैंगिक शोषणाचे आरोप

Shirur News : धक्कादायक..सोने चोरीसाठी तोडला महिलेचा कान; दरोडेखोरांचे भयानक कृत्य

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT