Wai Assembly Election 2024: लोकसभेत धोक्याची घंटा, विधानसभेला कस लागणार, मकरंद पाटलांना रोखण्यासाठी शरद पवार डाव टाकणार? असं असेल राजकीय गणित..

Wai constituency Assembly Election 2024: वाई विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे मकरंद पाटील हे विद्यमान आमदार आहेत. तर त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाकडून मदन भोसले हे प्रमुख विरोधक आणि विधानसभेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत.
Wai Assembly Election 2024: लोकसभेत धोक्याची घंटा, विधानसभेला कस लागणार, मकरंद पाटलांना रोखण्यासाठी शरद पवार डाव टाकणार? असं असेल राजकीय गणित..
Wai constituency Assembly Election 2024:Saamtv
Published On

राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर राज्याचे राजकारण बदलून गेले आहे. विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले उमेदवार अन् पक्ष एकत्र आल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळत आहे. अशीच लढत असलेला मतदार संघ म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाई- खंडाळा- महाबळेश्वर विधानसभा मतदार संघ. वाई विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे मकरंद पाटील हे विद्यमान आमदार आहेत. तर त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाकडून मदन भोसले हे प्रमुख विरोधक आणि विधानसभेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत.

मात्र सध्या दोन्ही पक्ष महायुतीमधून सत्तेत आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वाई मतदार संघात उमेदवारीवरुन महायुतीतच खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांकडे केलेल्या आमदारांना पाडणारच असा चंग शरद पवार यांनी बांधला आहे. त्यामुळे मकरंद पाटील यांच्याविरोधात शरद पवार तसेच महाविकास आघाडी कोणता डाव टाकणार? हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. कसं असेल वाई विधानसभा मतदार संघाचे विधानसभा निवडणुकीचे राजकीय गणित? वाचा सविस्तर...

Wai Assembly Election 2024: लोकसभेत धोक्याची घंटा, विधानसभेला कस लागणार, मकरंद पाटलांना रोखण्यासाठी शरद पवार डाव टाकणार? असं असेल राजकीय गणित..
Maharashtra Politics : विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा मुंबईकडे मोर्चा; ठाण्यात आज ठाकरे गटाचा मेळावा, तर कॉंग्रेसची मुंबई जोडो यात्रा

वाई विधानसभेचे राजकारण!

वाई खंडाळा महाबळेश्वर हा तीन तालुक्यांचा मिळून तयार झालेला हा मतदार संघ सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद पाटील हे सध्या वाई विधानसभेचे नेतृत्व करत आहेत. भौगोलिकरित्या विस्तीर्ण अशा या भागातले प्रश्नही अनेक आहेत. याआधी मकरंद पाटील यांना विरोध केलेले मदन भोसलेही सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, दुसरीकडे राष्ट्रवादीमधील फुटीनंतर मकरंद पाटील यांनी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याुळे विधानसभेला मकरंद पाटील यांच्यासमोर कोणाचे आव्हान असणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.

मकरंद पाटलांचे वर्चस्व..

वाई विधानसभा मतदार संघामध्ये मकरंद पाटील यांचे वर्चस्व आहे. २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीनवेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत वाई विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मकरंद पाटील आणि काँग्रेसचे मदनराव भोसले यांच्यामध्ये लढत झाली होती. या निवडणुकीत मकरंद पाटील यांनी बाजी मारली होती. मकरंद पाटील यांना १,०१,२१८ मदनराव भोसले यांना ६२,५१६ मते मिळाली होती. त्यानंतर झालेल्या २०१९ च्या निवडणुकीत मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली, मात्र त्यांना पुन्हा पराभव स्विकारावा लागला होता. या निवडणुकीत मकरंद पाटील यांना 1 लाख 30 हजार 486 मते तर विरोधी उमेदवार मदन भोसले यांना 86 हजार 839 मतं मिळाली होती.

Wai Assembly Election 2024: लोकसभेत धोक्याची घंटा, विधानसभेला कस लागणार, मकरंद पाटलांना रोखण्यासाठी शरद पवार डाव टाकणार? असं असेल राजकीय गणित..
Karad South Assembly: कराड दक्षिणचे बदलतं राजकारण, पृथ्वीराज बाबांपुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान; कसं असेल विधानसभेचं गणित?

महायुतीत बंडखोरीची शक्यता..

सध्या दोन्हीही उमेदवार महायुतीत असल्याने उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? याबाबत संभ्रम असला तरी विद्यमान आमदार म्हणून मकरंद पाटील हेच याठिकाणी प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे आता मदन भोसले नेमकी कोणती भूमिका घेणार? ऐनवेळी ते अपक्ष रिंगणात उतरणार का? की जागा वाटपावरुन महायुतीमध्येच महायुद्ध होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शरद पवार कोणता डाव टाकणार?

दुसरीकडे राष्ट्रवादीमधील बंडानंतर मकरंद पाटील हे अजित पवारांसोबत केले आहेत. मकरंद पाटील यांच्या दोन साखर कारखान्यांनाही अजित पवार यांनी मोठा निधी दिल्याने ते दादांची साथ सोडणे शक्य नाही. परंतु लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला असला तरी वाईमधून त्यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. हेच मताधिक्य मकरंद पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा असून शरद पवार हे विधानसभेला मकरंद पाटील यांना रोखण्यासाठी तगडा उमेदवार देण्याची शक्यता आहे.

Wai Assembly Election 2024: लोकसभेत धोक्याची घंटा, विधानसभेला कस लागणार, मकरंद पाटलांना रोखण्यासाठी शरद पवार डाव टाकणार? असं असेल राजकीय गणित..
Pune News : मोठी बातमी! पुण्यातील नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका? पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

लोकसभेचे लीड धोक्याची घंटा!

काही महिन्यांपूर्वी यासंदर्भात वाईमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांची शरद पवारांसोबत पुण्यामध्ये बैठक झाली होती. त्यामुळे विधानसभेला मकरंद पाटील यांना रोखण्यासाठी शरद पवार यांनी उमेदवार दिल्यास मकरंद पाटील यांच्या अडचणी वाढू शकतात. अर्थातच सध्यातरी मकरंद पाटील यांची या विधानसभेवर मजबूत पकड असून त्यांचेच पारडे जड वाटत आहे.

मात्र निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता असून मकरंद पाटलांना जोर का झटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही?त्यामुळे वाई मतदार संघात मकरंद पाटील चौकार मारणार की त्यांचा विजयरथ रोखण्यासाठी महाविकास आघाडी मोठा डाव टाकणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Wai Assembly Election 2024: लोकसभेत धोक्याची घंटा, विधानसभेला कस लागणार, मकरंद पाटलांना रोखण्यासाठी शरद पवार डाव टाकणार? असं असेल राजकीय गणित..
Raj Thackeray: 'मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार, उद्धव ठाकरेंचं राजकारण', राज ठाकरेंचे गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com