Pune News : मोठी बातमी! पुण्यातील नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका? पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

Police Issued Discotheque Cancellation Notice To Famous Hotel Pune : पुण्यातील नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका असल्याचं सांगितलं जातंय. या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आलेत.
पुणे पोलीस अमितेश कुमार
Pune Police amitesh Kumar Saam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुण्यातील एका नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका असल्याचं सांगितलं जात आहे. सतत गर्दीने गजबजणाऱ्या त्या हॉटेलला पत्र लिहून धोका असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. हॉटेलमधील डिस्कोथेक रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देत पोलिसांनी सुरक्षेचा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कल्याणी नगर भागात हे नामांकित हॉटेल आहे.

नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका?

दरम्यान, पुणे पोलिसांनी दिलेल्या या पत्रामध्ये सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केलाय. या हॉटेलमध्ये लोक दारु पिऊन धिंगाणा करीत असतात. सध्या अतिरेकी कारवायांबाबत अलर्ट आहे. एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करुन बॉम्बस्फोटासारखी (Pune News) दुर्घटना घडवून आणू शकते. यातून मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी यातून दिलाय.

पुणे पोलीस अलर्ट मोडवर

हे पत्र स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सहीने संबंधित विभागाला पाठवण्यात आलंय. या हॉटेलने आत्तापर्यंत अनेक वेळा नियमांचे उल्लंघन केलंय. त्या ठिकाणी असलेल्या डिस्को थेकमुळे आजूबाजूला राहत असलेल्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागला ( Discotheque Cancellation Notice) आहे, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय संबंधित हॉटेलवर याआधी सुद्धा अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, याचा देखील उल्लेख आहे. याप्रकरणी पुणे पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत.

पुणे पोलीस अमितेश कुमार
Pune News : नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत, पुण्यातील तरुणानं टोकाचं पाऊल उचललं, आयुष्य संपवलं!

डिस्कोथेक रद्द करण्यासाठी योजना

दरम्यान, 'त्या'हॉटेल आस्थापनेने वेळोवेळी नियम, कायदे, अटी आणि शर्थीचा भंग केलाय, असं पत्रामध्ये नमूद केलं (security Issue in Pune) आहे. पुढे याच पत्रात पोलिसांनी थेट सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केलाय. सदर ठिकाणी कोणतीही चोख सुरक्षा व्यवस्था नाहीये. एखादी आपत्कालीन घटना झाल्यास कोणत्याही प्रकारची पर्यायी प्रभावी सुरक्षा यंत्रणा नाही, असं देखील ( Famous Hotel In Pune) म्हटलं आहे. यावेळी पुणे पोलिसांनी डिस्कोथेक रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस हॉटेलला बजावली आहे.

पुणे पोलीस अमितेश कुमार
Pune Crime News : उच्चभ्रू सोसायटीतून ३० लाखांच्या ३० सायकली चोरल्या; कारण एकदा ऐकाच, पोलीसही चक्रावलेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com