Raj Thackeray: 'मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार, उद्धव ठाकरेंचं राजकारण', राज ठाकरेंचे गंभीर आरोप

MNS Chief Raj Thackeray Press Conference: राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण, आगामी विधानसभा निवडणूक तसेच बीडमध्ये झालेल्या राड्यावरुन महत्वाचे विधान केले तसेच राज्य सरकार आणि विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला.
Raj Thackeray: 'जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार, उद्धव ठाकरेंचं राजकारण', राज ठाकरेंचे गंभीर आरोप
Raj Thackeray On JarangeSaam Digital
Published On

छत्रपती संभाजीनगर, ता. १० ऑगस्ट २०२४

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विधानसभेच्या तयारीसाठी मराठवाड्याचा दौरा करत आहेत. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या दौऱ्याचा समारोप होत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे विधानसभेचे राजकारण असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.

काय म्हणाले राज ठाकरे?

"माझा मराठवाडा दौरा आज पूर्ण होत आहे. यापुढे विदर्भ दौरा सुरू होईल. दिवाळी नंतर विधानसभा होतील असं चिन्ह आहे, असं आज तरी वाटतंय. माझा दौरा पूर्ण झाला. मध्ये जो गॅप होता तो भरून काढला. नराठवाड्यातील राजकारण पाहत होतो त्याची प्रचिती आली, मराठा आरक्षणाला विरोध अशा बातम्या केल्या गेल्या. मात्र आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे, इथे बऱ्याच गोष्टी असल्यानं आरक्षण नकोय अशी भूमिका आहे. असं राज ठाकरे म्हणाले.

शरद पवार, उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

तसेच "आताच्या दौऱ्यात जरांगे पाटील यांचा काहीच विषय नाही, पण जरांगेंच्या पाठीमागून शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे राजकारण आहे. कुणाला पेवर ब्लॉक कॉन्ट्रॅक्ट मिळाले, प्लॉट मिळाले, गाड्या घेतल्या याची चौकशी होईल, हे सर्व विधानसभेसाठी सुरू आहे, पुढच्या तीन महिन्यात दंगली घडवण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे, समाजात विष कालवून राजकरण करू नये' असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.

Raj Thackeray: 'जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार, उद्धव ठाकरेंचं राजकारण', राज ठाकरेंचे गंभीर आरोप
Maharashtra Politics : विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा मुंबईकडे मोर्चा; ठाण्यात आज ठाकरे गटाचा मेळावा, तर कॉंग्रेसची मुंबई जोडो यात्रा

माझ्या नादाला लागू नका...

"शरद पवारांसारखा अनुभवी माणूस महाराष्ट्रात मणिपूर होईल, असं वक्तव्य केले जातेय. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. शरद पवारांचे राजकारण पाहिले तर तुम्हाला समजेल. दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं, हे शरद पवारांनी राष्ट्रवादी निर्माण केल्यानंतर सुरु झाले, असे म्हणत या लोकांनी माझ्या नादी लागू नये. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत," असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

Raj Thackeray: 'जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार, उद्धव ठाकरेंचं राजकारण', राज ठाकरेंचे गंभीर आरोप
Supreme Court: खासगी शाळांना आरटीईमधून सूट नाहीच! सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का; उच्च न्यायालयाचा आदेश कायम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com