Karad South Assembly: कराड दक्षिणचे बदलतं राजकारण, पृथ्वीराज बाबांपुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान; कसं असेल विधानसभेचं गणित?

Karad South Constituency Assembly Election 2024: आजपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदार संघात आता अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपनेही पाय रोवण्यास सुरूवात केल्याने विधानसभेला गड शाबूत ठेवण्यासाठी पृथ्वीराज बाबांचा कस लागणार आहे.
Karad South Assembly: कराड दक्षिणची बदलतं राजकारण, पृथ्वीराज बाबांपुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान; कसं असेल विधानसभेचं गणित?
Karad South Constituency Assembly Election 2024: Saamtv
Published On

लोकसभेतील मोठ्या विजयानंतर महाराष्ट्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवण्यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिण मतदार संघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदार संघात आता अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपनेही पाय रोवण्यास सुरूवात केल्याने विधानसभेला गड शाबूत ठेवण्यासाठी पृथ्वीराज बाबांचा कस लागणार आहे. काय आहे कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचा राजकीय इतिहास अन् पार्श्वभूमी? कसं असेल आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित अन् राजकारण, वाचा सविस्तर...

Karad South Assembly: कराड दक्षिणची बदलतं राजकारण, पृथ्वीराज बाबांपुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान; कसं असेल विधानसभेचं गणित?
Maharashtra Politics: विधानसभेआधी मोठा ट्वीस्ट! बच्चू कडू 'महायुती'मधून बाहेर पडण्याची शक्यता, आज तिसऱ्या आघाडीची घोषणा करणार?

कराड दक्षिण काँग्रेसचा बालेकिल्ला!

महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक म्हणून कराड दक्षिण विधानसभेकडे पाहिले जाते. काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील- उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे कराड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पहिल्यापासून या मतदार संघावर काँग्रेसने आपला दबदबा कायम ठेवला आहे, मात्र अलिकडच्या काळात अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपनेही या मतदार संघात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे.

अतुल भोसलेंच्या नेतृत्वात भाजपने पाय रोवले

अतुल भोसले हे काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई असून कराडमधील युवा नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. सध्या अतुल भोसले हे कृष्णा कॉलेजचे संचालक आहेत तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत. गेल्या पाच वर्षांपासून विविध निवडणुकांमध्ये त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

Karad South Assembly: कराड दक्षिणची बदलतं राजकारण, पृथ्वीराज बाबांपुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान; कसं असेल विधानसभेचं गणित?
MNS Assembly Election: मनसेच्या आणखी दोन उमेदवारांची घोषणा; हिंगोलीत मविआ,महायुतीचं टेन्शन वाढणार

२०१४, २०१९ला काय झालं?

२०१४ मध्ये या मतदार संघात काँग्रेसकडून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपकडून अतुल भोसले आणि विलासकाका पाटील उंडाळकर अशी तिरंगी लढत झाली होती. या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी बाजी मारली होती. पृथ्वीराज चव्हाणांना त्यावेळी 76 हजार 831 मतं मिळाली होती, तर विलासकाकांना 60 हजार 413 मतं आणि अतुल भोसले यांनी तब्बल 58 हजार 621 मतं मिळवली होती.

२०१९ मध्येही कराड दक्षिणमध्ये तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, भाजपकडून अतुल भोसले आणि उदयसिंह पाटील हे अपक्ष रिंगणात उतरले होते. या निवडणुकीतही पृथ्वीराज चव्हाण यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली होती. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना 92 हजार 296, भाजपच्या अतुल भोसले यांना 83166 तर अपक्ष उमेदवार उदयसिंह पाटील यांना 29401 मते मिळाली होती. आता विधानसभेची हॅट्रिक मारण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण हे तिसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरतील. मात्र अतुल भोसले यांच्या तगड्या आव्हानामुळे त्यांच्यासाठी ही लढाई सोप्पी नसेल.

Karad South Assembly: कराड दक्षिणची बदलतं राजकारण, पृथ्वीराज बाबांपुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान; कसं असेल विधानसभेचं गणित?
Karad North Assembly Election: शरद पवारांचा शिलेदार षटकार मारणार? बाळासाहेब पाटलांसमोर महायुतीचे तगडे आव्हान; कसं असेल राजकीय समीकरण?

कोणाचे पारडे जड?

डॉ. अतुल भोसले हे कराडचे युवा, सुशिक्षित नेते म्हणून ओळखले जातात. अतुल भोसले हे सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. अतुल यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तर स्वत: अतुल भोसले हे कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते मतदार संघांमध्ये काम करत जनतेच्या संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना दिलेल्या लीडने त्यांनी त्याची चुणूकही दाखवून दिली आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री आणि दोन वेळा आमदार असा दिर्घकाळ अनुभव असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचीही मतदार संघावर पकड आहे. अनेक विकासकामांमधून त्यांनी लोकप्रियता मिळवली आहेत. तसेच लोकसभेतील मोठ्या यशानेही काँग्रेसला राज्यात अनुकूल वातावरण तयार झाले आहे. राज्यात सध्या मराठा- ओबीसी वाद सुरू असून त्याचाही या निवडणुकीत प्रभाव पडणार आहे. थोडक्यात दोन तगड्या उमेदवारांमध्ये होणाऱ्या या लढतीत कोण बाजी मारणार? पृथ्वीराज बाबा गड राखणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Karad South Assembly: कराड दक्षिणची बदलतं राजकारण, पृथ्वीराज बाबांपुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान; कसं असेल विधानसभेचं गणित?
Manish Sisodia Bail: ब्रेकिंग! आप नेते मनिष सिसोदिया यांना सर्वोच्च दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर, १८ महिन्यांनंतर होणार सुटका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com