Maharashtra Politics: विधानसभेआधी मोठा ट्वीस्ट! बच्चू कडू 'महायुती'मधून बाहेर पडण्याची शक्यता, आज तिसऱ्या आघाडीची घोषणा करणार?

Maharashtra Assembly Election 2024: . विधानसभेच्या रणनितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जोर-बैठका सुरू असतानाच महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Bachchu Kadu: 'विधानसभेत शेतकऱ्यांची तिसरी आघाडी असणार', बच्चू कडूंचे मोठे विधान; पाठिंबा कुणाला? सांगूनही टाकलं
Bachchu KaduSaam TV
Published On

अमर घटारे, अमरावती|ता. ९ ऑगस्ट २०२४

राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्याने महायुती- महाविकास आघाडीमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विधानसभेच्या रणनितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जोर-बैठका सुरू असतानाच महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आज प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू हे महायुतीमधून बाहेर पडून तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथे बच्चू कडू भव्य मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामधून ते महायुतीतून बाहेर पडून तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी काढण्याबाबत सूचक संकेतही दिले आहेत.

त्यामुळे आज बच्चू कडू छत्रपती संभाजीनगर येथील मोर्चातून तिसऱ्या आघाडीची घोषणा करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची तिसरी आघाडी काढण्याबाबत विधान केले होते. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्यास आम्ही विधानसभेतून माघार घेऊ, असेही ते म्हणाले होते.

Bachchu Kadu: 'विधानसभेत शेतकऱ्यांची तिसरी आघाडी असणार', बच्चू कडूंचे मोठे विधान; पाठिंबा कुणाला? सांगूनही टाकलं
Maharashtra Politics 2024 : भाजप वाढवणार ठाकरेंचं टेंशन?; कोकण, मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लॅन?

त्यामुळे आज बच्चू कडू हे तिसऱ्या आघाडीबाबत काय निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केल्यास महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे तसेच महाविकास आघाडीचेही गणित बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या दृष्टीने बच्चू कडू काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Bachchu Kadu: 'विधानसभेत शेतकऱ्यांची तिसरी आघाडी असणार', बच्चू कडूंचे मोठे विधान; पाठिंबा कुणाला? सांगूनही टाकलं
Kolhapur News: कोल्हापुरात ग्रामस्थ आक्रमक, तलाठी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला कोंडलं; नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com