Maharashtra Politics 2024 : भाजप वाढवणार ठाकरेंचं टेंशन?; कोकण, मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लॅन?

Vidhan Sabha Election : ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा मास्टर प्लॅन भाजपकडून आखण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये, यात प्रामुख्यानं कोकण आणि मुंबईतील नेत्यांचा समावेश असणार आहे.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital
Published On

ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा मास्टर प्लॅन भाजपकडून आखण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये...यात प्रामुख्यानं कोकण आणि मुंबईतील नेत्यांचा समावेश असणार आहे. भाजपनं काय रणनिती आखलीये पाहूया..

विधानसभेत ठाकरेंच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्यासाठी भाजपने मास्टर प्लॅन आखल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबई आणि कोकणात सर्वाधिक जागा जिंकून आणण्यासाठी भाजपने विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी भाजपनं मुंबई-कोकणातील ठाकरे गटातल्या नाराज मोह-यांना हेरून ठाकरेंना घेरण्याची रणनीती आखलीय. एवढंच नव्हे तर त्यांना भाजपात आणण्याचे प्रयत्नही केले जाणार आहेत. य़ाची जबाबदार मंत्री आणि प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आलीय. कोकणाची जबाबदारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर तर मुंबईची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवेंनी भाजपला टोला लगावलाय. ..

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकण आणि मुंबईसाठी काय केलं आणि काय केलं नाही याचा पाढाच भाजप नेते आता वाचणार आहेत. तसंच महायुती सरकारने कोकण आणि मुंबईसाठी केलेली कामं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्टही भाजपनं ठेवलंय. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नारायण राणेंनी ठाकरेंच्या कोकणातील गडाला आधीच सुरूंग लावलाय...मुंबईत भाजपचा एकमेव खासदार निवडून आला. तर ठाकरे गटाचे 3 खासदार निवडून आले. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणातलं शिंदे आणि ठाकरेंचं बलाबल पाहूयात.

Maharashtra Politics 2024
Manoj Jarange Patil : 'कोण आहे रे तिकडे, की छगन भुजबळ आलेत'; मनोज जरांगें यांची सांगलीत तुफान फटकेबाजी

कोकणचा गड कोण राखणार?

2109च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 8 पैकी 6 आमदार विजयी

शिंदे गटात - योगेश कदम (दापोली)

उदय सामंत (रत्नागिरी)

दीपक केसरकर (सावंतवाडी)

ठाकरे गटात -

भास्कर जाधव (गुहागर),

राजन साळवी (राजापूर)

वैभव नाईक (कुडाळ)

राज्यातील विधानसभा निवडणुका अधिक चुरशीच्या होणार यात शंका नाही. त्यात मुख्य लढत फडणवीस विरुद्ध ठाकरे अर्थात भाजप विरुद्ध ठाकरे गट अशीच होणार आहे. त्यामुळे कोण कोणाला शह देणार आणि कोण सुरुंग लावणार हेच पाहायचंय.

Maharashtra Politics 2024
Bachchu Kadu Slap Officer : बच्चू कडूंचा चढला पारा! अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com