गणेश कवाडे, मुंबई|ता. ९ ऑगस्ट २०२४
पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेला झालेल्या गद्दारीला कामातून धडा शिकवा, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. काल रात्री मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमध्ये बैठक झाली. यावेळी त्यांनी विधानसभेसंदर्भात नेत्यांना मार्गदर्शन केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेला झालेल्या गद्दारीला कामातून धडा शिकवा, प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लावण्यास मी स्वतः मदत करेल असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना विधानसभेचा कानमंत्र दिला. तसेच लोकसभेत ज्या ज्या मुद्यांवर फटका बसला, त्याचाही या बैठकीत आढावा घेतला असून मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, याबरोबरच शेतमालाचा भाव यावरही आमदारांसोबच चर्चा केली.
लाडकी बहिण, युवा प्रशिक्षण या योजना प्रत्येक गावात पोहोचवा, महायुतीच्या स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करा, असे म्हणत जिंकून येणाऱ्या आमदारालाच विधानसभेचे तिकिट देणार असा थेट इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
दरम्यान, आगामी विधानसभेसाठी मतदारसंघातीलकामे मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठक बोलावली आहे. भाजप आमदारांना बळ देण्यासाठी विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न असून भाजपच्या आमदारांसोबत चर्चा केल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर आता तातडीच्या बैठका घेण्यात येत आहेत. आमदार श्वेता महाले, राणा जगजितसिंह पाटील, मोनिका राजळे, तुषार राठोड, महेश लांडगे, संजय सावकारे आणि मंगेश चव्हाण यांच्या मागण्यांवर आज बैठक होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.