Ajit Pawar: अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचंय? सिनिअर दादांना ज्युनिअर्सनं मागे टाकले

Ajit Pawar Statement On CM Post: अजित पवार यांनी परत एका मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवलीय. आपल्याला आधी सांगितलं असतं तर आपण संपूर्ण पार्टीसोबत असती असं विधान अजित पवार यांनी केलंय.
Ajit Pawar: अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचंय? सिनिअर दादांना ज्युनिअर्सनं मागे टाकले
Ajit Pawar Yandex
Published On

आता बातमी आहे अजित पवारांसंदर्भातली...मुख्यमंत्री होण्याची दादांची इच्छा लपून राहिलेली नाही. ठाण्यातील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्य़ांनी आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली. दादांची टोलेबाजी राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलीय.

अजित पवार स्पष्टवक्ते,रोखठोक असा दादांचा बाणा उभ्या राज्यानं अनेकदा पाहिलायं. आणि त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छाही लपून राहिलेली नाही. हाच अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रमात सर्वांना पुन्हा एकदा आला. या कार्यक्रमात अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी करत मुख्यमंत्रिपदाबाबतची खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली. मात्र यावेळी त्यांनी आपले ज्युनिअर असलेले फडणवीस आणि एकनाथ शिंदे कसे पुढे निघून गेले याची कैफियतच मांडली.

रोखठोक भूमिका मांडणारे दादा एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट भाजप आणि एकनाथ शिंदेंमध्ये झालेल्या सत्तेच्या डीलवरच भाष्य केलं. शिंदेंनी केवळ काही आमदार आणले आणि मुख्यमंत्री झाले. भाजपनं आपल्याला मुख्यमंत्री केले असते तर अख्खी पार्टीच आणली असती असं सांगून दादा मोकळे झाले. दादांच्या या फटकेबाजीमुळे त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आता थेट शिंदेंसारखीच संधी अजितदादांना द्यावी यासाठी भाजपला गळ घातलीय.

अजितदादांनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री न झाल्याची खदखद बोलून दाखवली होती. बंड केल्यानंतर कमी आमदार असूनही शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळालं मात्र तेवढेच आमदार आणून आपल्याला उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागल्याची नवी खदखद अजितदादांना सतावतेय की काय अशी चर्चा आता रंगू लागलीय.

Ajit Pawar: अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचंय? सिनिअर दादांना ज्युनिअर्सनं मागे टाकले
Ajit Pawar: भावांनो, विजबिल भरु नका, कुणी आलं तर माझ्याकडे पाठवा : अजित पवार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com