Maharashtra Politics : आगामी निवडणुकीनंतर अजित पवार मुख्यमंत्री होणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, VIDEO

dharmarao baba atram on ajit pawar : आगामी निवडणुकीनंतर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, असं वक्तव्य मंत्री धर्मराव बाबा आत्रम यांनी केलं. धर्माराव बाबा आत्रम यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेदरम्यान, मंत्री धर्माराव बाबा आत्रम यांनी अजित पवारांवर मोठं वक्तव्य केलं आहे.

मंत्री धर्माराव बाबा आत्रम म्हणाले, 'आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अडीच महिने उरले आहेत. जागावाटपात कमी जास्त होईल. १०० टक्के जागा जिंकूण आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागील गोष्टी विसरून पुढचा विचार केला पाहिजे'.

'भाजप मोठा पक्ष आहे. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे. हे भाजप पक्षाचं मोठेपण आहे. आगामी विधानसभेनंतर अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते संधी मिळाल्यास त्यांना मुख्यमंत्री होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. अजित पवार यांना संधी दिली पाहिजे. ते महाराष्ट्राचे डॅशिंग नेते आहेत. दहा दहा बजेट त्यांनी सरकारला दिले आहेत. अजित पवारांनी शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यासाठी बजेट दिलं आहे', असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com