पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राला सुवर्ण पदक जिंकण्यासाठी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र फायनलमध्ये नीरज चोप्राला रौप्य पदावर समाधान मानावं लागलं आहे. १४० कोटी चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र पाकिस्तानच्या अरशद नदीमने हे स्वप्न भंग केलं आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरजला बॅक टू बॅक सुवर्ण पदक जिंकण्याची संधी होती. मात्र अरशद सिंगने नीरज चोप्राच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. (Neeraj Chopra)
पहिल्या प्रयत्नात नीरज चोप्राने फाऊल थ्रो केला. त्यामुळे त्याचा थ्रो काऊंट केला गेला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.४५ मीटर भाला फेकत दमदार कमबॅक केलं. मात्र नीरजने थ्रो करण्यापूर्वी पाकिस्तानच्या अरशद नदीमने ९२.९७ मीटर भाला फेकून इतिहास रचला. हा ऑलिम्पिक इतिहासातील सर्वश्रेष्ठ थ्रो ठरला होता. सुरवातीच्या ३ प्रयत्नात ८९.४५ मीटर हा नीरजचा सर्वोत्तम थ्रो ठरला.
पाकिस्तानच्या अरशद नदीमने ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात ९२.९७ मीटर लांब भाला फेकत इतिहास रचला. यापूर्वी कुठल्याही खेळाडूला इतक्या लांब भाला फेकता आला नव्हता. त्यामुळे नीरज चोप्राला सुवर्णपदक जिंकण्यासाठी ९२.९७ मीटर पेक्षा लांब भाला फेकायचा होता. मात्र ८९.४५ हा त्याचा सर्वोत्तम थ्रो ठरला. हा त्याचा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो ठरला आहे.
नीरज चोप्रा कितीही शांत आणि संयमी दिसत असला तरीदेखील त्याच्यावरील दबाव स्पष्ट दिसून येत होता. कारण नीरजने यापूर्वी इतके फाऊल थ्रो कधीच केले नव्हते. मात्र अरशद नदिमने ९२.९७ मीटर लांब भाला फेकल्यानंतर नीरज चोप्रावर दबाव वाढला. या नादात त्याने फाऊल थ्रो केले. मात्र ८९.४५ मीटर हा त्याचा सर्वोत्तम थ्रो ठरला. त्यामुळे त्याला रौप्यपदक मिळालं. अरशद नदीम सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. तर त्रिनिदाद अँड टबॅगोचा केशोर्न हा ८६.१६ मीटर थ्रोसह कांस्य पदकाचा मानकरी ठरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.