Maharashtra Politics 2024 : दिल्लीवारीनंतर ठाकरे गटाची सीएमपदावरून माघार? मविआत मुख्यमंत्रिपदावरून मतभेद?

MVA CM Candidate : गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचे संकेत देत होते. मात्र दिल्लीवारीनंतर राऊतांचा सूर बदलताना दिसतोय.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital
Published On

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचे संकेत देत होते. मात्र दिल्लीवारीनंतर राऊतांचा सूर बदलताना दिसतोय. त्यात काँग्रेस आक्रमक झालीये. त्यामुळे मविआत मुख्यमंत्रीपदावरुन बेबनाव सुरू झाल्याचं चित्र आहे. पाहूया एक रिपोर्ट...

मुख्यमंत्रिपदावरून मविआत आक्रमक पवित्रा घेणारा ठाकरे गट उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौ-यानंतर बॅकफूटवर गेल्याची जोरदार चर्चा रंगलीय. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी केल्या. मात्र सर्वाधिक चर्चेतली भेट ठरली ती उद्धव ठाकरे आणि गांधी कुटुंबीयांची. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर स्वतंत्रपणे सोनिया गांधींचीही सहकुटुंब भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरेंनी काँग्रेस हायकमांडशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर नेहमी आक्रमकपणे भूमिका मांडणारे संजय राऊतांनी संयमी भूमिका घेतलीय.

तर दुसरीकडे काँग्रेसनं मात्र आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय. निवडणुकीपूर्वी मुख्यमंमत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार नसल्याचंच काँग्रेसकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे निवडणुकीनंतर ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री अशी थेट भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मांडलीय.

Maharashtra Politics 2024
Amol Kolhe : त्या अपघातात अमोल कोल्हे जखमी; मंचरच्या सभेपूर्वी गाठलं हॉस्पिटल

दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी स्वत:ला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न तितकासा यशस्वी झाला नसल्याचं दिसतय....त्यामुळे ठाकरे गट मुख्यमंत्रिपदावरून सबुरीची भूमिका घेताना दिसतोय. तर काँग्रेसनं थेट सूत्रच ठरवून टाकलंय. मात्र यावर तिसरा मित्र पक्ष असलेल्या शरद पवारांची राष्ट्रावादी काँग्रेस काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे.

Maharashtra Politics 2024
Reliance Industries : रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये नोकरकपात; तब्बल ४२ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, मोठं कारण आलं समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com