Hindi Language Saam Tv
महाराष्ट्र

Hindi Language: हिंदी भाषेचा वेळापत्रकात समावेश, SCERT ने सुरु केली अंबलबजावणी

Hindi Language New Timetable: हिंदी भाषा सक्तीवरुन सध्या राजकारण तापलं आहे. हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्यास सांगितले आहे. त्यानंतर आता एससीईआरटीने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.

Siddhi Hande

राज्यात हिंदी भाषा सक्तीवरुन खूप वाद सुरु आहेत. त्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यात सर्व शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्यात येईल. इंग्रजी आणि मराठी शाळांमध्ये पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून शिकवण्यात येईल.या निर्णयानंतर आता शाळेचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले आहे.

एससीईआरटीने (SCERT) विषयनिहाय योजना प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर तिसऱ्या भाषेसाठी पाठ्यपुस्तके आणि शिक्षकांची उपलब्धता, ऑनलाइन कसे शिकवायचे आणि पद्धत याबाबत कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाही.

एससीईआरटीने नवीन वेळापत्रक (SCERT New Timetable) जाहीर केले आहे. त्यामध्ये मराठी शाळांमध्ये मराठी (स्तर १), इंग्रजी (स्तर २), हिंदी आणि इतर भाषा, गणित कलाशिक्षण, आरोग्य, कार्यशिक्षण या विषयांचा समावेश आहे. इंग्रजी माध्यमांमध्ये इंग्रजी (स्तर १), मराठी (स्तर २), हिंदी किंवा इतर भाषा, गणित, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण या विषयाचा समावेश आहे.

इतर शाळांमध्ये हिंदी, उर्दू, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलुगु, सिंधी, बंगाली (स्तर १ भाषा), यानंतर इंग्रजी (स्तर २), मराठी आणि गणित, कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण असे विषय असणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी स्काउट गाइड हा पर्यायी विषय असणार आहे.

वेळापत्रकाबाबतचे (New Timetable) निर्देश देण्यात आले आहेत. तासिकेंच्या क्रमावारीमध्ये किंवा शाळा सुरु करण्याच्या विषयांमध्ये बदल करण्यात येईल. मात्र, वार्षिक घड्याळी तासांचा कालावधी कोणत्याही तासासाठी कमी करता येणार नाही, असं सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT