Maharashtra Rain Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Unseasonal Rain Update: अवकाळीचा फटका! बीडमध्ये पुरामुळे 10 गावांचा संपर्क तुटला, राज्यात मोठं नुकसान

Latest News: एकीकडे राज्यामध्ये कडाक्याचे ऊन त्यामध्ये अवकाळी पावसाची बॅटिंग सुरु आहे.

Priya More

Maharashtra News: राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) चांगलाच फटका बसला आहे. पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात आला आहे. एकीकडे कडाक्याचे ऊन त्यामध्ये अवकाळी पावसाची बॅटिंग सुरु आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशामध्ये बीडमध्ये (Beed) आज झालेल्या मुसळधार पावसामुळे अमृत नदीला पूर येत 10 गावांचा संपर्क तुटत जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर बीडच्या केळगावमध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

बीडमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा कहर केलाय. जिल्ह्यातील बीड, गेवराई, केज, अंबाजोगाई, माजलगावसह सर्वच ठिकाणी तुफान पावसासह गारपिटीने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. तर यादरम्यान वीज पडून शेतात काम करत असताना शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर पशुधनाचे देखील मोठे नुकसान झाले. ही दुर्दैवी घटना बीडच्या केज तालुक्यातील केळगाव आणि काळेगावमध्ये घडलीय.

अंबाजोगाईच्या वाघाळा परिसरात वीज पडून 3 बैल, 2 म्हैस आणि 2 शेळ्या दगावल्या आहे. तर मुसळधार पावसामुळे बीड शहरातील मुख्य बस स्थानकाला तळ्याचे स्वरूप आलं आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्याने, जीवितहानीसह घरांची पडझड झाली आहे. त्याचबरोबर शेतपिकांचे देखील नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडल्याने, भोजगाव परिसरातील अमृता नदीला पूर आला आहे. यामुळे भोजगावसह कोमलवाडी, देवपिंपरी, अंतरवली, कळण्याचीवाडी, भोंडगाव तांडा, धोंडराई, देवपिंप्री, पिंपळगाव, माटेगाव या 10 गावांचा संपर्क तुटला आहे.

लातूरमध्ये वीज पडून जनावरे दगावली

लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील तब्बल 31 जनावरे आणि 20 कोंबड्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा, चाकूर ,उदगीर, देवणी तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

शेतकऱ्यांच्या फळबागांचे, रब्बी पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा तालुक्यातील हाडगा शिवारातील गहिनीनाथ जाधव या शेतकऱ्याच्या गोठ्यावर वीज कोसळून गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. या घटनेत गहिनीनाथ जाधव यांच्या गोठ्यातील 3 बकरे, 2 गाई, 1 म्हैस आणि 20 कोंबड्या जळून खाक झाल्या आहेत.

जालन्यात बैल-म्हशीचा मृत्यू

जालन्या जिल्ह्यात देखील अवकाळी पावासाने मोठे नुकसान झाले आहे. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी शिवारात बैलगाडीला बांधलेल्या बैलाच्या अंगावर वीज पडल्याने बैल जागीच ठार झाला. तर दुसऱ्या घटनेत दोदडगाव येथील गावडे यांच्या शेतात लिंबाच्या झाडावर वीज पडल्याने लिंबाच्या झाडाला बांधलेली एक म्हैस दगावली.

सोलापूरात फळबागांचे नुकसान

दुसरीकडे, -सोलापूर शहरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पजत आहे. विजांच्या कडकडाटासह सोलापुरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शहरातील झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी परिसरात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी आणि पपईच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तर वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. दरम्यान, राज्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

SCROLL FOR NEXT