APMC Election: मोठी बातमी! कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पैसे वाटप; भाजप आमदारावर गंभीर आरोप

भाजप आमदार नारायण कुचे मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार संतोष सांबरे यांच्याकडून करण्यात आला आहे.
APMC Election
APMC ElectionSaam TV

Maharashtra Market Committee Election: अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे आणि भाजपा आमदार नारायण कुचे यांच्यात मोठा वाद पेटला आहे. भाजप आमदार नारायण कुचे मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार संतोष सांबरे यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीतील वातावरण तापल्याचं दिसत आहे. (Political News)

अंबड शहराजवळ असलेल्या हॉटेल सुखसागरमध्ये आमदार नारायण कुचे पैसे वाटत असल्याचा शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलाय. उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे आणि भाजपा आमदार नारायण कुचे यांच्यात पैसे वाटपावरून वाद सुरू आहे. पैसे वाटप होत असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना देखील दिली आहे.

APMC Election
Uttar Pradesh Crime : बाप झाला हैवान! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या तोंडात केमिकल ओतलं, गळा दाबला अन्...; पोटच्या मुलीसोबत असं का केलं?

माजी आमदार संतोष सांबरे यांच्याकडून पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडे आमदार नारायण कुचे पैसे वाटप करत असल्याची लेखी तक्रार देण्यत आली आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून हॉटेलच्या सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली आहे. पैसे वाटप करत असताना एक जण बॅग घेऊन पळाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

शिंदे गटाकडून बोगस मतदान? अपक्ष उमेदवाराचा गंभीर आरोप

पुण्यातही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Election) निवडणुकीत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. शिवाजी मराठा मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा दावा करत मतदारांनी गोंधळ घातला. दरम्यान, मतदान केंद्राबाहेर बऱ्याच मतदारांनी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत राडा करणाऱ्या मतदारांना मतदान बाहेर काढलं.

APMC Election
Pandharpur Accident News: वादळी वाऱ्याने झोळी हवेत उडाली; २ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत, मन सुन्न करणारी घटना

बोगस मतदान करायचं असेल, तर मतदान बंद करा असं म्हणत, मतदारांनी चांगलाच संताप व्यक्त केला. खोटे आधार कार्ड छापून मतदान केलं जात असल्याचा आरोपही मतदारांनी केला. हा प्रकार बंद झाला नाही तर आम्ही मतदानावर बहिस्कार टाकू, असं देखील मतदारांनी सांगितलं आहे. दरम्यान, हा वाद पोलिसांनी वेळेवर मिटवला असून सध्या पुण्यात शांततेत मतदान सुरू आहे.

राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी (Election) आज मतदान होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून ठिकठिकाणी मतदानाला सुरूवात झाली असून मतदान केंद्राबाहेर पोलिसांना चोख बंदोबस्त आहे. अशातच पुणे आणि जळगावमध्ये बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तातडीने मतदान थांबवावं अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com