Uttar Pradesh Crime : बाप झाला हैवान! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या तोंडात केमिकल ओतलं, गळा दाबला अन्...; पोटच्या मुलीसोबत असं का केलं?

Father Killed Daughter : अर्धमेल्या अवस्थेत रस्त्त्याच्या कडेला सापडलेल्या या तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
uttar pradesh crime news
uttar pradesh crime news saam tv

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीची तिच्या वडिलांनी आणि भाऊजींनी (बहिणीचा पती) हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अत्यंत क्रूकपणे त्यांनी तरुणीच्या हत्येचा कट रचला. अर्धमेल्या अवस्थेत रस्त्त्याच्या कडेला सापडलेल्या या तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Crime News)

तरुणीच्या लग्नाला अवघे काही तास झाले होते. ती आपल्या सासरी गेली होती. दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा माहेरी घेऊन येण्यासाठी तिचे भाऊजी आणि वडील एकत्र गेले होते. बरेली येथे तिचे माहेर असून या घरी तिचे आई वडील आणि बहिण, तिचे पती असा परिवार आहे. मुलीला घारी आणताना वाटेतच तिच्या वडिलांनी तिच्या तोंडात कापडाचा एक बोळा कोंबला. त्यानंतर त्यांनी तिच्या तोंडात आणि अंगावर केमिकल ओतलं. तसेच तिला भरपूर मारहाण केली तिचा गळा देखील आवळला आणि रस्त्त्याच्या कडेला तिला फेकून दिले.

uttar pradesh crime news
Pune Crime News: एकतर्फी प्रेमातून खडकीतील खून; कर्नाटकमधून आरोपी ताब्यात

काही वेळाने त्या रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींना तरुणी अर्धमेल्या अवस्थेत सापडली. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. त्यानंतर या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.

डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीविषयी सांगताना म्हटले की,"तिला जास्त प्रमाणात मारहण केल्याने मुका मार लागला आहे. तिच्या तोंडात केमीकल ओतल्याने जबडा पूर्ण भाजला आहे. तसेच तिचं शरीरही भाजलं आहे. त्यामुळे तिला काहीच बोलता येत नाही.त्यामुळे पोलिसांनी तिचं म्हणणं लेखी लिहून घेतलं आहे.

uttar pradesh crime news
Pune Cyber Crime: ऑनलाईन जेवण मागवताय तर सावधान..महिलेला ४०० रुपयांची थाळी पडली २ लाखला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांआधीच या तरुणीचे लग्न झाले. तिच्या आई बाबांच्या पसंतीच्या मुलाबरोबर तिचं लग्न (Wedding) झालं होतं. मात्र तरुणीचे दुसऱ्या एकावर प्रेम होते. तिला त्या मुलाबरोबर राहायचे होते. मात्र घरच्यांचा तिच्या प्रेमाला विरोध होता. मुलीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून तिच्या वडिलांनी तिला अशी अमानुष वागणूक दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com