Ramdas Athawale Latest News
Ramdas Athawale Latest NewsSaam Tv

Ramdas Athawale Latest News : मला मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली इच्छा

Ramdas Athawale want to become Chief Minister: मला मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली इच्छा
Published on

Ramdas Athawale Latest News : 'मलाही मुख्यमंत्री व्हावं, असं वाटतं' असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अलीकडेच एका मुलाखतीत मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे पोस्टरही लावण्यात आले होते. यावरच आठवले यांनी टोला लगावत असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री पदाच्या चढाओढीतून भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हे हास्यास्पद, असं सांगलीत पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले आहेत.  (Latest Marathi News)

Ramdas Athawale Latest News
Supreme Court: ठाकरे गटाला मोठा दिलासा, पक्षाची संपत्ती शिंदे गटाला देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

रामदास आठवले म्हणाले की, ''अजितदादांना तिकडे संधी मिळेल,असे वाटत नाही. आम्हाला अजितदादांची आवश्यकता नाही. ते म्हणाले, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यात चढाओढ सुरू आहे. पण जोपर्यंत एकनाथ शिंदे आहेत, तोपर्यंत दुसऱ्या कोणाचा नंबर लागणार नाही. शरद पवार यांनी एनडीए सोबत यायला पाहिजे, मी आलो आहे. तर पावर यांनी यायला हरकत नाही.''

Ramdas Athawale Latest News
Sanjay Raut On Barsu Refinery Protest: 'Mr. उदय सामंत, बारसूच्या आजूबाजूच्या जमिनीचे खरे मालक कोण?' राऊतांचा सवाल

ते म्हणाले, ''शरद पवार यांनी आता ठोसपणे निर्णय घ्यावा. त्याच बरोबर ज्यांनी यायचे आहे, असे सांगण्या पेक्षा शरद पवारांनी आमच्या सोबत यावे.''

उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणाऱ्या टीकेवर बोलताना मंत्री आठवले म्हणाले, ठाकरे हे आमचे मित्र आहेत. तसेच ठाकरे सुसंस्कृत देखील आहेत. पण त्यांनी बोलताना भान ठेवून बोलावं,असा सल्ला आठवले यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com