Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaam tv

Sanjay Raut On Barsu Refinery Protest: 'Mr. उदय सामंत, बारसूच्या आजूबाजूच्या जमिनीचे खरे मालक कोण?' राऊतांचा सवाल

Sanjay Raut News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही बारसू प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
Published on

Sanjay Raut News: बारसू रिफायनरी विरोधात सुरु असलेलं स्थानिकांनी आंदोलन करत पाचव्या दिवशीही आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलनकर्त्या नागरिकांवर पोलिसांनी लाठिचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. या बारसू रिफायनरी विरोधात विरोधी पक्षानेही सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही बारसू प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

'मिस्टर उदय सामंत, बारसूच्या आजूबाजूच्या जमिनीचे खरे मालक कोण आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)

बारसू रिफायनरी विरोधात ठाकरे गटानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलनकर्त्या नागरिकांवर पोलिसांनी लाठिचार्ज केल्याचा निषेध करताना संजय राऊत म्हणाले, 'प्रत्येकाचा फायदा आणि तोटा पाहून बारसूतील आंदोलकांवर कारवाई होत आहे. शरद पवार यांनी चर्चेतून विषय काढावा असे सांगितले'.

Sanjay Raut News
Barsu Refinery Protest: बारसू आंदोलकांवर लाठिचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले? उदय सामंत म्हणतात...

'या विषयावर देवेंद्र फडणवीस काही बोलायला तयार नाहीत. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच अनावरण करण्यासाठी मॉरिशसला मोगलाईचे आदेश देऊन गेले आहेत, असे राऊत म्हणाले.

'देशात निपराध लोकांचा आवाज दडपला जात आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रातील जनतेच्या किंकाळ्या ऐका. हा अत्यंत्य अमानुष प्रकार आहे. कोकणातील लोकांची डोकी फुटत असतील, कोकणी जनतेला मारहाण होत असेल तर त्यांच्यावरील अत्याचार आम्ही सहन करणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

'मॉरिशसलाला बसून गृहमंत्री आदेश देत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मनात असतं तर लाठीचार्ज थांबले असते. पण सर्व आदेश दिल्लीतून दिले जात आहेत. आतांपर्यंत असा अत्याचार झाला नव्हता, असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut News
Barsu Refinery Police Lathicharge: आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर 'स्वाभिमानी' आक्रमक; चलाे बारसू... राजू शेट्टींचे शेतक-यांना आवाहन

'मिस्टर उदय सामंत, बारसूच्या आजूबाजूच्या जमिनीचे खरे मालक कोण आहेत? त्यांची खरे नावे सांगा. बेनामी मालमत्ता कोणाची आहे? ते सांगा. ती मालमत्ता कोणी घेतली आहे, ते सांगा. नाव दुसऱ्यांची आहेत. त्याचे खरे मालक कोण आहेत, ते सांगा. बाहेरची लोक ही तुमचे कोण लागतात, हे सांगा . तुम्ही भूमीपुत्रांना बाहेरचे म्हणता? हा अमानुष खेळ दिल्लीच्या आदेशाने सुरू आहे, अशा शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com