Ajit Pawar On Barsu Refinery Project: 'रिफायनरीवरुन ठाकरे गटामध्येच मतभिन्नता..' अजित पवार यांचे मोठे विधान, म्हणाले; विकासाला विरोध नाही...

Barsu Refinery Protest: बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेले आंदोलन सध्या चांगलेच चिघळल्याचे दिसत आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar saam tv

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Ajit Pawar News: बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात (Barsu Refinery Project) सुरू असलेले आंदोलन सध्या चांगलेच चिघळल्याचे दिसत आहे. महिला अधिक आक्रमक बारसू येथील महिला अधिक आक्रमक झाल्या आहेत. काहीही झालं तरी आम्ही येथून हलणार नाही. आम्हाला प्रकल्प नकोय. कोणीही प्रकल्पाची जबरदस्ती करु नये, असे सांगत महिला आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

या प्रकल्पामुळे राज्याचे राजकारणही चांगलेच तापले असून ठाकरे गटाकडून याबाबत स्थानिकांच्या बाजूने असल्याची भूमिका घेतली असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा विकासाला विरोध नसल्याचे सांगत लोकांना समजून सांगायला हवं अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar
Barsu Refinery Protest: धूर सोडल्यामुळे श्वास कोंडला; आम्ही चोरी करण्यासाठी आलो आहे का? आंदोलकाचा संतप्त सवाल

काय म्हणाले अजित पवार...

"नाणारबद्दल जसा प्रश्न उपस्थित झाला होता, तेव्हा उद्धव साहेबांनी याचा विषय घेतला होता. या प्रकल्पाने परिसराचे कायमचे नुकसान होणार असेल तर विरोध नक्की करा. पण त्यातून जर फायदा होणार असेल तर त्याचा विचार करायला हवा," असे याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले. तसेच रिफायनरीवरुन ठाकरे गटातील आमदार, खासदारांमध्येच मतभिन्नता असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यांनी राजन साळवी यांची भूमिका वेगळी असल्याचं म्हटलं आहे.

Ajit Pawar
Dhule News: धुळ्यात मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांनी गर्दी पांगवण्याठी केला लाठीचार्ज

राष्ट्रवादीचा विकासाला विरोध नाही...

तसेच याबद्दल पुढे बोलताना अजित पवार यांनी "राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका विकासकामामध्ये पॉझिटिव्ह राहिलेली आहे, बेरोजगारी आणि महागाईमध्ये रोजगार मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे यातून जर रोजगार येऊन आणि तिथे वातावरण आणि निसर्गाला बाधा येणार नसेल तर स्थानिकांशी चर्चा करुन मार्ग काढायला हवा," असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com