Heatstroke ST Bus Conductor Dies saam Tv
महाराष्ट्र

Buldhana Heatwave: राज्यात उन्हाने होरपळ; बुलढाण्यात एसटी बस वाहकाचा उष्माघाताने मृत्यू

Heatstroke ST Bus Conductor Dies: बुलढाण्यातील तापमानात प्रचंड वाढ झालीय. तापमानाचा पारा ४० अंश पार गेलाय. उष्माघातामुळे एका बस वाहकाचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

संजय जाधव, साम प्रतिनिधी

विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हाने जीवाची लाही लाही होतेय. बुलढाणा जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ झालीय. उन्हाचा तडाखा बसल्याने बस वाहकांचा मृत्यू झाल्याची घटना चिखलीत घडलीय. संजय भगवान मोरे वय 30 वर्ष असे मृत झालेल्या वाहकाचे नाव आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ झालीय. जिल्ह्यातील तापमान ४० अंशाच्या पार गेले आहे. या उन्हाचा तडाखामुळे बस वाहकांचा मृत्यू झालाय. ड्युटीवर जाण्याअगोदर संजय मोरे यांना उष्मघाताचा त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. संजय मोरे हे काल बुऱ्हाणपूर येथून ड्युटीवरून आले होते. आज मोरे यांना त्रास होऊ लागला होता. संजय मोरे हे चिखली डेपो मध्ये होते कार्यरत होते.

विदर्भ आणि मराठवाड्यासोबत राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान वाढलंय. गेल्या तीन दिवसांतच पाऱ्याने ४० हून ४५ अंश सेल्सियसपर्यंत मजल मारलीय. रविवारपासून तीन दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत देखील तापमानाने उच्चांक गाठल्याने लोक घरातून बाहेर पडण्यास घाबरत आहेत.

हवामान विभागाने सोमवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, नागपूर या शहरांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केलाय. उष्मघातापासून वाचण्यासाठी आवश्यकती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

चंद्रपूरचा पारा ४५.६ अंशावर

देशात तापमानासाठी कुप्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरात आज ४५.६ अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली. हे राज्यातील सर्वाधिक तापमान आहे. काल ४४.६ अंशाची नोंद झाली होती, तर आज त्यात पुन्हा एका अंशाची भर पडलीय. पारा चढू लागल्याने लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. प्रशासनाने २७ तारखेपर्यंत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अजून पाच ते सहा दिवस तापमान कायम राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT