Buldhana : उष्मघाताने घेतला विद्यार्थ्याचा बळी; उन्हाचा त्रास झाला, रुग्णालयात नेताना वाटेतच जीव सोडला

Buldhana District Reports First Heat-Related Death: इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा उष्मघातामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने तसेच पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
Buldhana
BuldhanaSaam
Published On

राज्यात तापमानात झपाट्याने वाढ होत असून, बुलढाणा जिल्ह्यातही उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. या वाढत्या उष्णतेचा गंभीर परिणाम आता शाळकरी मुलांवर होऊ लागला आहे. इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. विद्यार्थी शाळेमधून घरी येत होता. अचानक त्याची तब्येत बिघडली. प्राथमिक उपचार करून त्याला अकोला नेण्यात येत होते, मात्र रस्त्यावरच त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्देवी घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

संस्कार सोनटक्के असे विद्यार्थ्याचे नाव आहे. हा चिमुकला शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठ विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत होता. बऱ्याच दिवसांपासून उष्मघाताच्या त्रासामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. संस्कार शाळेतून घरी परतला होता. घरी परतल्यानंतर त्याची अचानक तब्येत बिघडली.

Buldhana
Malegaon: धक्कादायक! १० वीची परिक्षा दिली अन् काही दिवसांतच विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं; परिसरात खळबळ

प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे नेत असतानाच, रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्देवी मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Buldhana
Shocking: मासिक पाळी आल्याची शिक्षा, वर्गाबाहेर काढलं; पायऱ्यांवर बसून विद्यार्थिनीने दिली परीक्षा; पाहा धक्कादायक VIDEO

शाळकरी मुलांवर उष्णतेचा गंभीर परिणाम

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. या उष्णतेमुळे रोगराई वाढत आहे. या उष्माघाताचा शाळकरी विद्यार्थ्यांवर थेट परिणाम होऊ लागला आहे. या उष्माघाताचा बुलढाण्यात पहिला बळी गेला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे शाळा प्रशासनाने तसेच पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com