Malegaon: धक्कादायक! १० वीची परिक्षा दिली अन् काही दिवसांतच विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं; परिसरात खळबळ

Class 10 Student Ends Life in Malegaon Village: मालेगावातील राजुरा गावातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Malegaon
MalegaonSaam Tv
Published On

मालेगावातून एक ह्रदयद्रावक घटना समोर येत आहे. १६ वर्षीय एका अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उशीरा उघडकीस आली. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. अल्पवयीन तरूणीने आत्महत्या का केली? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. आत्महत्येच्या या बातमीमुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

संगीता राऊत असे मृत तरूणीचे नाव आहे. तरूणी राजुरा गावातील रहिवासी होती. तिने नुकतीच मार्च महिन्यात इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. परिक्षेनंतर अवघ्या काही आठवड्यात तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

Malegaon
Satara News: बेपत्ता चिमुकलीचा शेतातच मृतदेह सापडला, अपघात की घातपात? ५ वर्षीय मुलीसोबत नेमकं काय घडलं?

तरूणीने आत्महत्या नेमकी का केली? का कुणी घातपात केला? याचाही शोध पोलीस घेत आहेत. अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Malegaon
Shocking: मासिक पाळी आल्याची शिक्षा, वर्गाबाहेर काढलं; पायऱ्यांवर बसून विद्यार्थिनीने दिली परीक्षा; पाहा धक्कादायक VIDEO

काही दिवसांपूर्वी गावात सात वर्षीय चरण बोंढारे या चिमुकल्याचा मृत्यू आगीमुळे झाला होता. या दुखा:तून गाव सावरत असतानाच संगीताने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या दोन्ही घटनांमुळे गावातील वातावरण अधिकच भावनिक झाले आहे. या घटनेचा अधिक तपास मालेगाव पोलीस करीत असून, पोलिसांनी प्राथमिक माहिती गोळा करून तपासाला सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com