Yavatmal Heatwave Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal: उन्हाचा कहर! एकाच दिवशी उष्माघाताचे ३ बळी, यवतमाळमध्ये खळबळ

Yavatmal Heatwave: यवतमाळमध्ये उन्हाचा पारा चढत चालला आहे. वाढत्या उष्णतेमुळे यवतमाळमध्ये एकाच दिवशी तिघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Priya More
  • यवतमाळमध्ये उष्माघाताने ३ जणांचा मृत्यू

  • विदर्भात तापमान ४७ अंशांवर

  • महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट

  • हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. अशात यवतमाळमध्ये उष्माघाताने तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तिघांपैकी एकाची ओळख पटली आहे तर इतर दोघांची ओळख पटली नाही. या तिन्ही व्यक्तींचे मृतदेह यवतमाळमधील दिग्रस येथे वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आणि दुपारच्या वेळी उन्हात घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून आणि डॉक्टरांकडून केले जात आहे.

यवतमाळच्या दिग्रसमध्ये एकाच दिवशी तिघांचा उष्मघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर विरेंद्र अस्वार यांनी ही माहिती दिली. एकाची ओळख पटली तर दोघांची ओळख अजूनही पटली नाही आहे. दिग्रस शहरातील वेगवेगळ्या भागात त्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. एका तरुणाचा मृतदेह गाडीमध्ये तर इतर दोघांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला पडल्याचे आढळून आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.

यवतमाळ जिल्ह्यात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. ३ मृतांपैकी एकाची ओळख पटली आहे. ओळख पटलेल्या मृतांचे नाव आनंद राजु वाडवे (वय २६ वर्षे) असं आहे. हा तरुण हिंगोलीच्या म्हैस गव्हाणे येथे राहणारा आहे. तर इतर दोघे हिंगोलीचेच आहे. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

मृतक राजु वाडवे हा प्रचंड उकाड्यात वाहनातच झोपलेला होता. उन्हाचा कडाका जास्त असल्यामुळे त्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर जुन्या बस स्थानक परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. तर तिसरा व्यक्ती ५० वर्षीय असून त्याचा मृतदेह शासकीय विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्याच्या कडेला आढळून आला.Heatwave

दरम्यान, महाराष्ट्रात सूर्य आग ओकत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट आली असून तापमान ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तापमान जास्त राहणार आहे. विदर्भातील वर्धा आणि ब्रह्मपुरीत तापमान ४७ अंश सेल्सिअसवर गेले आहे.

विदर्भामध्ये सध्या उष्णतेची प्रचंड लाट सुरू असून बहुतांश ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. वर्धा आणि ब्रह्मपुरी हवामान केंद्रात राज्यातील सर्वाधिक म्हणजेच ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वर्धा, अमरावती आणि आणखी एका जिल्ह्याला पुढील दोन दिवसांसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Dhule: चाकणमधील २० कंपन्यांच्या स्थलांतरावर शरद पवारांची चिंता सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

अमरावतीच्या निवासी आश्रमशाळेत भूत? 600 विद्यार्थिनींनी घराकडे ठोकली धूम

Husband - Wife : बायको अचानक नवऱ्याच्या जीवावर का उठते? कारणे आणि आकडेवारीही धक्कादायक, सर्वाधिक घटना कोणत्या राज्यात?

Maharashtra Weather: राज्यातील २७ जिल्ह्यांसाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; मुंबईसह कोकण विदर्भाचं हवामान कसं असणार?

Fact Check: रेशन कार्ड बंद होणार? जनता लाभांपासून वंचित राहणार?

SCROLL FOR NEXT