अमरावतीच्या निवासी आश्रमशाळेत भूत? 600 विद्यार्थिनींनी घराकडे ठोकली धूम

Ghost’ Rumours Scare 600+ Girls Away From Amravati Ashram School: राज्याच्या दुर्गम भागातील निवासी आश्रमशाळेत भूताच्या अफवेनं मोठा गोंधळ उडाला... भीतीनं गाळण उडालेल्या तब्बल 600 मुलींनी घराकडे परतल्या... त्यानंतर विद्यार्थिनींचं समुदेपशन होऊन त्या शाळेकडे परतत आहेत. मात्र, या अफवेमुळे शाळेतील भयाण वास्तव उघडकीस आलंय... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
AMRAVATI ASHRAM SCHOOL GHOST RUMOUR: 600+ GIRLS LEAVE HOSTEL
AMRAVATI ASHRAM SCHOOL GHOST RUMOUR: 600+ GIRLS LEAVE HOSTELsaam tv
Published On

ही आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील आदिवासी आश्रम शाळा... अमरावतीमधील आदिवासी आश्रम शाळेतील विषबाधेचं प्रकरण ताज असतानाच आता याच आश्रमशाळेत मुलींना भूतबाधा झाल्याचा धक्क्दायक दावा करण्यात येतोय. डोमा येथील आदिवासी आश्रम शाळेत मुलींना भूतबाधा झाल्याच्या अफवेमुळे ६०० पेक्षा जास्त मुली थेट शाळा सोडून घरी निघून गेल्यानं खळबळ उडाली. आदिवासी आश्रमशाळेत नेमकं काय घडलंय ते पाहूयात...

आश्रमशाळेत भुताची अफवा

सात-आठ दिवसांपूर्वी आश्रमशाळेतील 15 ते 16 विद्यार्थिनी अचानक हसायला आणि रडायला लागल्या. तर काही विद्यार्थिनींनी घुंगरांचा आवाज ऐकू येत असल्याचं सांगितलं. ही माहिती गावात पसरल्यानंतर भूतबाधेची अफवा पसरली. त्यानंतर 600 हून अधिक विद्यार्थिनी भीतीपोटी थेट वसतिगृह सोडून घरी निघून गेल्य़ा.

या आश्रमशाळेत नेमकं काय घडलं आणि सध्या तिथली काय परिस्थिती आहे हे साम टीव्हीनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला...मात्र ज्या विद्यार्थिनींसोबत हे घडलं तेही आम्ही जाणून घेतलं. जी विद्यार्थिनी या ठिकाणी होती तिला याबाबच विचारलं असता तीनं काय सांगितलं ते पाहूयात...

महत्त्वाचं म्हणजे, शाळेच्या आवारातील मोहाचं झाड तोडल्यानं हा प्रकार झाल्याचा आरोप पालकांनी केलाय. याच अनुषंगानं आमच्या प्रतिनिधींनी मुख्याध्यापक संजय चौधरी यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत. एव्हंढच नाहीतर, भूतबाधेच्या घटनेनंतर राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती मेळघाट मध्ये तळ ठोकुन आहे. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट या शाळेत धाव घेत विद्यार्थिनींमधील भीती काढण्यासाठी त्यांचं समुपदेश सुरू केलंय.

य़ा समुपदेशनानंतर विद्यार्थिनी पुन्हा शाळेत येऊ लागल्या आहेत. मात्र या भुताच्या अफवेनिमित्तानं या आश्रमशाळेतल्या असुविधांचं वास्तव समोर आलंय. एका छोट्या खोलीत तब्बल ४०-५० विद्यार्थिनींना कोंबलं जातं. त्य़ामुळे त्यांचा अभ्यास आणि शिक्षणावर परिणाम होतो. त्यात अशा अफवांमुळे त्यांच्यात भीती पसरून आणखीनच त्यांचं खच्चीकरण होतं. त्यामुळे त्यांना योग्य सुविधा आणि त्यांचं वेळोवेळी समुपदेशनाची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com