
देशभरात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जगातील २० सर्वात उष्ण शहरांपैकी एक शहर वगळता बाकी सर्व भारतात आहेत. ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये तापमान ४७ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. हवामान विभागाने लोकांना दुपारी बाहेर न जाण्याचा आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिलाय.
ओडिशातील बलांगीर आणि बिहारमधील सासाराम ही सर्वाधिक उष्ण शहरांपैकी आहेत. ज्या ठिकाणी तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि छत्तीसगडमधील बिलासपूरमध्येही तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने प्रचंड उष्णता होती.
आंध्र प्रदेशातील राजामहेंद्रवरम, छत्तीसगडमधील महासमुंद, तसंच उत्तर प्रदेशातील मोरादाबाद आणि मिर्झापूर याठिकाणीही तीव्र उष्णतेचा तडाखा बसला असून, तापमान ४७ अंशांपर्यंत पोहोचलंय. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले होते. सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे वीज आणि पाण्याची मागणीही झपाट्याने वाढतेय.
बिहारमधील बक्सर, उत्तर प्रदेशातील जौनपूर आणि प्रयागराज, आणि तेलंगणातील खम्मम यांचाही जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये समावेश होतो. या सर्व शहरांमध्ये तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. या तीव्र उष्णतेमुळे सामान्य नागरिक आणि प्राणी दोघांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचं दिसून आलं.
उत्तर प्रदेशातील सीतापूर आणि पिलीभीत, छत्तीसगडमधील रायपूर आणि उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्येही उष्णतेची लाट दिसली. या शहरांमध्ये तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. दिवसा उष्णतेच्या लाटेमुळे रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
छत्तीसगडमधील दुर्ग, ओडिशामधील राउरकेला आणि उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर व बरेली यांचाही सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत समावेश आहे. या शहरांमधील तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. हवामान विभागाच्या मते, पुढील काही दिवस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.