Maharashtra Weather: राज्यातील २७ जिल्ह्यांसाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; मुंबईसह कोकण विदर्भाचं हवामान कसं असणार?

Maharashtra Weather Update: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढील पाच दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. मुंबईसह कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील हवामानाचा ताजा अंदाज जाणून घ्या.
Maharashtra Weather Update:
Maharashtra weather forecast next five days heavy rain alertsaam tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

  • कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

  • विदर्भासह महाराष्ट्रात काही ठिकाणी कमी पाऊस

गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर, महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावायला सुरुवात केलीय. राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून कुठे जोरदार पाऊस कोसळत आहे तर कुठं पावसानं उघडीप दिलीय. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, 7 दिवसांत राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर त्याचबरोबर घाटमाथ्यांवरती मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Weather Update:
Rain Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, मुंबईसह ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

आजपासून पुढील पाच दिवस मुंबई सह संपूर्ण कोकण, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर अशा 27 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित मराठवाडा आणि अहिल्यानगर व सोलापूर अशा 9 जिल्ह्यात किरकोळ पाऊस होईल, अशी शक्यता आहे.

Maharashtra Weather Update:
School Homework:विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास देण्यावर बंदी; रत्नागिरीतील सर्व शासकीय आणि खासगी शाळांसाठी नियम लागू

बंगालच्या उपसागरात तयार झालेले हवेचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळं अरबी समुद्रातील पश्चिमी मान्सूनी वाऱ्यांना बळकटी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारे अधिक दक्षिण-वायव्येकडे सरकल्यानं ऑगस्टच्या उर्वरित शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. दरम्यान राज्याच्या निम्म्यापेक्षा जास्त भागात अद्यापही दमदार पावसानं हजेरी लावली नाहीये. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत . तर सुरुवातीच्या काळात मुंबईस कोकण पुणे, कोल्हापूर विदर्भातील काही भागामध्ये चांगला पाऊस झाला होता. यामुळं त्या ठिकाणच्या नद्या नाल्यांना पाणी आले होते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com