Maharashtra News Live Update: Dhule: चाकणमधील २० कंपन्यांच्या स्थलांतरावर शरद पवारांची चिंता सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

Marathi Breaking Live Headlines Updates : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, राज ठाकरेंचा पुणे दौरा, सुप्रीम कोर्टात शिवसेनेवर सुनावणी, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update :
Maharashtra Live News Update :Saam Marathi
Published On

चाकणमधील २० कंपन्यांच्या स्थलांतरावर शरद पवारांची चिंता सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडी प्रदूषण पाणी वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे २० कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याने हा गंभीर विषय असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. या कंपन्यांमध्ये दोन हजारांहून अधिक कामगार कार्यरत असून उद्योग आणि रोजगार टिकवण्यासाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली.

धावत्या पुणे -दानापूर एक्सप्रेसमध्ये दिसला साप; प्रवाशांची पळापळ, ट्रेन थांबवून बोगी केली रिकामी

गावच्या रस्त्यावर रिपोर्टिंग करणाऱ्या त्या शाळकरी मुलींना आदित्य ठाकरेंकडून सायकल भेट

रायगडच्या कर्जत तालुक्यातील कोंडीवडे गावातील खड्डेमय रस्त्याची व्यथा छत्रीचा माईक हातात धरत दाखवून दिली होती. यानंतर प्रशासनाकडून या मुलींच्या कार्याची दखल घेत येथील खड्डे त्वरित बुजवण्यात आले. विद्यार्थ्यांनीच्या या कामाची दखल घेत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या मुलींची संवाद साधत त्यांच कौतुक केल. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या मुलींना आज सायकली भेट देण्यात आल्या.

Dhule: पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे कॉलनी परिसरात जागोजागी साचले पाणी

शिंदखेडा शहरात पावसामुळे गुरुकृपा कॉलनीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचून परिसर जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे, सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटार व्यवस्था नसल्याने आणि रस्त्याची दुरवस्था झाल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे, यापूर्वीही स्थानिक नागरिकांनी शिंदखेडा नगरपंचायतीकडे या समस्येबाबत तक्रार केली होती, मात्र अद्याप कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे,

पावसाच्या पाण्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, नगरपंचायतीने तातडीने पाहणी करून गटार व्यवस्था व रस्ते दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अशी मागणी होत आहे, आता नगरपंचायत प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या समस्येवर काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासात शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च; ‘उद्योग दरबार’ सुरू करणार

गडचिरोलीला देशातील महत्त्वाचे ‘स्टील हब’ म्हणून विकसित करताना शेतकरी आणि स्थानिक नागरिकांचे हित सर्वोच्च ठेवले जाईल. उद्योगांसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पारदर्शक प्रक्रिया राबवा, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

गडचिरोलीतील उद्योग विभाग आणि एमआयडीसीच्या कामांचा आढावा घेताना सामंत यांनी जनता दरबाराच्या धर्तीवर ‘उद्योग दरबार’ सुरू करण्याची घोषणा केली. उद्योजकांच्या भूसंपादन, वीज, पाणी, परवानग्या आणि पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या एकाच व्यासपीठावर सोडविल्या जाणार आहेत.

सांगलीच्या रेणावी घाटात दोन एसटी बसचा भीषण अपघात

सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या रेणावी येथे 2 एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन ते तीन जण ठार झाले असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेणावी येथील घाटामध्ये समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. विटावून घेऊ घाटला जाणारी आणि विजापूरहून मेढा या ठिकाणी जाणाऱ्या बसचा समोरासमोर हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. यामधील काही जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

धाराशिव जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

अवैधरित्या गांजा आणि चरस विक्रीवर छापा, कारवाईत तब्बल ५० किलो ३५८ ग्रॅम गांजा आणि १३१ ग्रॅम चरस जप्त

आरोपीच्या दोन मजली आलिशान घराच्या दुसऱ्या मजल्यावर पत्त्याचा क्लब चालवला जायचा, त्या ठिकाणी चरस आणि गांजाचा साठा

त्यासह 21 तोळे सोने सह सात लाखाचा मुद्देमाल ही कारवाई जप्त

बाप्पा शंकर पवार असं आरोपीचं नाव ; आरोपी विरोधात ढोकी पोलिसात गुन्हा दाखल

एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा आणि चरस आरोपी कुठून आणत होता आणि कोणाला विक्री करत होता, याचा तपास सुरू

नायगावमध्ये बिल्डिंग दुरुस्तीचे काम चालू असताना कामगाराचा पडून मृत्यू

सी सेवन स्टार सिटी असे बिल्डिंगचे नाव असून बिल्डिंगचे रिपेरिंगचे काम सुरू होते

आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास काम करत असताना मजूर अचानक खाली कोसळला

त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

नायगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह श्रवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

यामुळे जुन्या इमारतींवर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे

कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर, महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर त्याचबरोबर घाटमाथ्यांवरती मुसळधार पाऊस होणार आहे. याबाबत हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांच्याबरोबर बातचीत केली आहे

खारघरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर १ कोटी ६४ लाखांचा डल्ला

खारघर सेक्टर १२ येथील कॅन्डीअर लाईफस्टाईल ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ कोटी ६४ लाख ३४ हजार ९७६ रुपयांचा ऐवज लंपास केला. १० ऑगस्ट रोजी रात्री दुकान बंद केल्यानंतर ११ ऑगस्ट रोजी सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस आले.

मनसेच्या दणक्याने बिर्ला ओपस प्रशासन नमले; महाड MIDCतील बोर्ड मराठीत

महाड MIDCमधील बिर्ला ओपस कलर कारखान्याने कारखान्याबाहेरील फलक मराठीत केल्याने मनसेच्या आंदोलनाला यश आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. कंपनीच्या परिसरातील सर्व बोर्ड इंग्रजीमध्ये असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला होता. फलक मराठीत न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर बिर्ला ओपस प्रशासनाने फलक मराठीत केले. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले असून, मराठी भाषेच्या वापरासाठी घेतलेल्या भूमिकेला यश मिळाल्याचा दावा केला आहे.

आरएसएस अदानींचे नोकर आहेत - राहुल गांधी

राष्ट्रीय संमेलनात राहुल गांधी लाईव्ह

चाणक्य २० दिवस कुठे गायब होते?

गृहमंत्री अमित शाहा संसदेत आले नाहीत

नाशिकच्या रस्त्यांवरून सरकारवर निशाणा; उद्योगांबाबतही गंभीर सवाल

नाशिकच्या दौऱ्यावर असताना शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून सरकारवर टीका करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून नाशिकचा प्रवास पाहत असून, आजही परिस्थितीत बदल झालेला नाही. समृद्धी महामार्गावरही ठिकठिकाणी पॅच पडल्याचे सांगत, अशा परिस्थितीत उद्योग येथे कसे येणार, असा सवाल करण्यात आला. दौऱ्यात ज्या ठिकाणी गेलो, तिथे लगेच जेसीबी आणून खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले, असा आरोपही करण्यात आला. दरम्यान, १७ तारखेला संजय राऊत नाशिकमध्ये मोर्चा काढणार असल्याचे सांगण्यात आले. डेंग्यू-मलेरियाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर असल्याचे नमूद करण्यात आले.

नंदुरबारमध्ये दरड कोसळून बीएलओ गंभीर जखमी; पायावर शस्त्रक्रिया

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात मतदार यादी पुनरीक्षणाचे शासकीय कर्तव्य बजावत असताना बीएलओ जितेंद्र विश्वासगीर गोसावी दरड कोसळून गंभीर जखमी झाले. मंडलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक असलेले गोसावी दुर्गम भागात जात असताना डोंगरावरून अचानक रस्त्यावर दरड कोसळली. मोठमोठे दगड त्यांच्या डाव्या पायावर आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Pandharpur: सरकारला पाय ठेवायला जागा राहणार नाही; जरांगेच पुन्हा सरकारला इशारा

पंढरपूर -

सरकारला पाय ठेवायला जागा राहणार नाही; जरांगेच पुन्हा सरकारला इशारा

अजून ही वेळ गेली नाही, मराठा सामाजी नाराजी ओढावून घेण्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे आणि शिरसाट यांनी आपली चूक सुधारावी.

मराठा समाज हा त्यांचा हक्काचा ओटर आहे. तो हातातून जाण्या आधी चुक सुधारावी. चार प्रमाण पत्रांचा विषय आहे.

त्याचा इतका विषय ताणण्याची गरज नाही. विषय साधा आहे.

Ahilyanagar: अहिल्यानगरातील धीरज परदेशी हत्या प्रकरणाचा येवल्यात निषेध

अहिल्यानगरातील धीरज परदेशी हत्या प्रकरणाचा येवल्यात निषेध

येवला सकल हिंदू समाजाकडून जोरदार घोषणाबाजी

अहिल्यानगर महानगरपालिकेतील कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ नाशिकच्या येवला शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

धीरज परदेशी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी देखील यावेळी तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली.

Nashik: आदित्य ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर, शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी

नाशिक -

- आदित्य ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर

- शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची आदित्य ठाकरेंकडून पाहणी

- सातपूर अंबड लिंक रोडवरील खड्ड्यांची आदित्य ठाकरे करतायत पाहणी

- खड्ड्यांच्या परिस्थितीचा घेतायत आढावा

- खड्ड्यांची पाहणी केल्यानंतर आदित्य ठाकरे नाशिक महापालिकेत ठाकरे गटाच्या नगरसेवकांची घेणार बैठक

- रस्त्यांवरील खड्डे, कुंभमेळ्याची काम आणि आणि अन्य समस्यांबाबत नगरसेवकांकडून घेणार आढावा

Dharashiv: अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या कारखान्याकडून शेतकऱ्यांची ऊस बिल थकवली

धाराशिव -

अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या कारखान्याकडून शेतकऱ्यांची ऊस बिल थकवली

माजी आमदार राहुल मोटे यांच्या भूम येथील बाणगंगा साखर कारखान्याबाहेर ऊस बिलासाठी शेतकऱ्यांच आंदोलन

उमरगा येथील राष्ट्रवादीचे नेते सुरेश बिराजदार यांच्या भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्यापाटोपाठ परांडा येथे राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक

थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

Nashik : त्र्यंबकेश्वरात जेसीबीचा वापर करत अतिक्रमण निर्मूलन मोहीम

नाशिक -

- त्र्यंबकेश्वरात जेसीबीचा वापर करत अतिक्रमण निर्मूलन मोहीम

- श्रावणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम

- अनेक हात गाड्या आणि अवैध दुकानात हटवण्यात आल्या

- रस्त्यावरील व्यावसायिकांमध्ये एकच गोंधळ

- शहरात कुंभमेळ्याची काम सुरू असल्यामुळे भाविकांची अडचण होऊ नये, यासाठी प्रशासन आणि पोलिस आक्रमक

Ratnagiri: हर्णे बंदरात टायगर कोळंबीची बंपर आवक, मच्छीमारांची लगबग

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच टायगर कोळंबीची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने मच्छीमारांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

हर्णेच्या समुद्रकिनाऱ्यालगत टायगर कोळंबी मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने पारंपरिक मच्छीमार बांधव पहाटेपासूनच समुद्रात जाऊन कोळंबी पकडण्यासाठी धडपड करत आहेत.

चांगली मिळकत होत असल्याने मच्छीमारांसाठी हंगामाची सुरुवातच फायदेशीर ठरत आहे.

टायगर कोळंबीला बाजारात चांगली मागणी आणि दर मिळत असल्याने मच्छीमारांच्या मेहनतीला आर्थिक हातभार लागत आहे.

त्यामुळे हर्णे बंदर परिसरात सध्या मासेमारीची लगबग वाढली असून, यंदाचा हंगाम चांगला जाण्याची आशा मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.

नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकून अपघात

वाशिम-मालेगाव मार्गावर झोडगा गावा जवळ भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट डिव्हायडरवर आदळून अपघात झालाय..या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातानंतर कारमधून सीएनजी गॅसची गळती सुरू झाल्याने घटनास्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना कारमधून बाहेर काढले. मात्र अम्ब्युलन्स वेळेवर उपलब्ध न झाल्याने पोलिसांच्या वाहनातूनच जखमींना रुग्णालयात नेण्याची वेळ आली. जखमींना वाशिम आणि मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

चाकणच्या उद्योगांसाठी उदय सामंत अॅक्शन मोडवर रविवारी चाकणमध्ये पाहणी

चाकण औद्योगिक वसाहतीतील अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे उद्योग स्थलांतराच्या तयारीत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर उद्योगमंत्री उदय सामंत अॅक्शन मोडवर आले आहेत. रविवारी ते चाकणमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून उद्योजकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. यासंदर्भात सामंत यांनी उद्योजकांशी फोनवरून संवाद साधला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महेश केदारचा जामीन अर्ज फेटाळला

संतोष देशमुख यांना संपवता वेळेस महेश केदार व्हिडिओमध्ये दिसतो सरकारी पक्षाचा युक्तिवाद.

सरकारी पक्षाने थेट व्हिडिओ दाखवत पुरावा दाखवला.

न्यायालयाकडून महेश केदारचा जामीन अर्ज फेटाळला.

आरोपी प्रतीक घुले संदर्भातही सरकारी पक्षाकडून न्यायालयात युक्तिवाद प्रत्येक गुलेला दुसऱ्या कारागृहात हलवणार दही बाजूंचा जोरदार व्यक्तिवाद.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींचे जामीन अर्ज आतापर्यंत फेटाळले.

आरोपींच्या न्यायालयातील मुक्काम वाढला.

पुढील सुनावणी 25 ऑगस्ट ला होणार.

अंबरनाथ- भाजपा मनसे राडा प्रकरण; शहराध्यक्ष शिर्के यांना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

अंबरनाथ मधील एका गाळ्याच्या ताब्यावरून भाजपा आणि मनसे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले होते. यावेळी अंबरनाथ मध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. या प्रकरणात पोलिसांनी मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना अटक केली. अटकेनंतर शिर्के यांना न्यायालयात हजर केले असता 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुरवण्यात आली आहे.

दोडामार्गची आमसभा तापली; शिंदे शिवसेना व ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले

ज्यांना सभागृहात बसायचे नसेल त्यांनी बाहेर जावे- आमदार दीपक केसरकर

सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण

दोडामार्ग तालुक्याची आमसभेत राडा

आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती आमसभा.

विरोधकांकडून स्थानिक प्रश्न उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवरून पडली वादाची ठिणगी

नाशिकमधल्या खड्ड्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महानगरपालिकेसमोर जोरदार आंदोलन

- पोवाड्याच्या माध्यमातून सवाल करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मनपा प्रशासन विरोधात आंदोलन

- नाशिकमध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना न्याय द्यावा कुटुंबातील सदस्याला महापालिकेत नोकरी द्यावी आणि नाशिक शहर हे तात्काळ खड्डेमुक्त व्हावं यासाठी शरद पवार राष्ट्रवादीकडून नाशिक महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन केले जात आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात FDA ची पुन्हा मोठी कारवाई

३ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल FDA कडून जप्त

पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाने १० ते ११ ऑगस्टदरम्यान प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात विशेष कारवाई केली

9 आस्थापनांची तपासणी करताना सर्व ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळले

चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी बैठक घेणार – उद्योगमंत्री उदय सामंत

चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये विविध बातम्या प्रसिद्ध होत आहेत. रस्त्यांच्या समस्येमुळे चाकणमधील काही कंपन्या महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यातून रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मयत नागेश गायकवाड यांच्या पत्नीची आत्महत्या

आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट

भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गणेश गायकवाडच्या पत्नीचे आत्महत्या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नगरच्या कांदा बाजारात कांद्याला उच्चांकी भाव

आज अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला ३,००० ते ३,५०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला असून त्यामुळे कांद्याच्या दरात झालेली ही वाढ शेतकरी बांधवांसाठी समाधानाची बाब मानली जातेय.

अनेक दिवसांपासून कांद्याला इतका विक्रमी भाव मिळत नसल्याने निराशा होती. मात्र भाव असेच स्थिर राहिले तर निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येणारा सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळू शकतो.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी रस्त्याची जिल्हा प्रशासनाने घेतली दखल

- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आमदार हिरामण खोसकर यांनी केली पेगलवाडी रस्त्याची पाहणी

- प्रशासनाला तत्काळ रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना

- पेगलवाडी येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी बाटलीचा माईक हाती घेत रस्त्याच्या दुरावस्थेची मांडली होती व्यथा

हिंगोली- स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही गावात सुविधा मिळत नसल्याने गावकरी 15 ऑगस्ट रोजी करणार बिऱ्हाड आंदोलन

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही रहिवासी वस्ती मधील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याने हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हट्टा गावच्या महिला ग्रामस्थ 15 ऑगस्ट रोजी हिंगोली मध्ये बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलन करणार आहेत, हट्टा ग्रामपंचायत प्रशासन रहिवासी वस्तीमध्ये नागरिकांना रस्ता उपलब्ध करून देत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून महिलांनी रस्त्याची मागणी केली आहे

लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब

विरोधी पक्षांच्या प्रचंड आंदोलनांमुळे आणि गदारोळामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन पूर्णपणे विस्कळीत झाले. गुरुवारी लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

शहादा तालुक्यातील वडाळी गावात अन्न औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई

शहादा तालुक्यातील वडाळी गावात अन्न आणि औषध प्रशासनाने धाड टाकून तब्बल 4 लाख 15 हजार रुपयांचा प्रतिबंधित विमल पान मसाला आणि सुगंधी तंबाखू जप्त केला आहे. कारवाईदरम्यान उमाराम झवर यांच्या मामाजी ट्रेडर्स किराणा दुकान, गोडाऊन आणि घरात 4 लाख 12 हजार 948 रुपयांचा तर ज्ञानेश्वर माळी यांच्या पान टपरीत 2 हजार 50 रुपयांचा माल आढळला.

५ हजार कोटींत शिवसेना विकली- संजय राऊत

आमदार फोडण्यात एवढे पैसे खर्च झाले'

'अमित शाहांच्या शेअर मार्केट मधून पक्ष विकला'

'यात निवडणुक आयोग दलाल आहे

शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांने महिलेचे वस्त्र परिधान करून केलं आंदोलन

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत तर कळमनुरी तालुक्यातील वडगाव मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध नसल्याने गावातील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाधर जाधव यांनी महिलेचे वस्त्र परिधान करून हातात डोक्यावर हंडा घेत ग्रामपंचायतीला शाळेत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी साकडे घातले आहे

Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

पारंपरिक शेतीला बगल देत एका अल्पभूधारक शेतकऱ्याला झेंडू फुल शेतीच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळाला आहे.

नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बेटक बिलोली येथील अल्पभूधारक शेतकरी मोहन कुऱ्हाडे यांनी आपल्या एकूण अडीच एकर शेती पैकी 20 गुंठे शेतीत झेंडूच्या फुलांची लागवड केली.

Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी

अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरात कॅफेच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केली आहे..

कॅफेच्या नावाखाली अश्लील गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती..

पोलिसांनी चार कॅफेवर कारवाई करत शाळा कॉलेजच्या काही मुला मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे..

Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील एका लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी पर्दाफाश केला.

याठिकाणाहून एका पिडीत महिलेला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं असून तिच्याकडून अनैतिक काम करवून घेणाऱ्या महिलेवर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी

सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्यावतीने दीप अमावस्या साजरी करण्यात आली आहे,

गटारी अमावस्या म्हणून साजरी केल्या जाणारया प्रथे विरोधात,शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी करण्यात आली.

विशेष म्हणजे तृतीयपंथीय व्यक्तींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. हिंदू संस्कृतीमध्ये दीप अमावस्या हा शब्द असताना गटारी अमावस्या म्हणून उल्लेख केला जातो,त्यामुळे हिंदू संस्कृतीच्या सणांबद्दल जनजागृती व्हावी,आणि सन्मान राखण्याच्या उद्देशाने शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली दीप अमावस्या सांगलीमध्ये साजरी करण्यात आली.

Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

- आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

- नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची करणार पाहणी

- १७ ऑगस्टला नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मोर्चा

दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त

दोडामार्ग तालुक्यातील पाळये गावात हत्तींच्या कळपाने धुमाकुळ घातला आहे. नारळ, केळी बागेत घुसलेल्या हत्तींनी मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. यामुळे शेतकर आणि बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच ते सहा हत्तीच्या कळपाचा सध्या पाळये व आजूबाजूच्या गावांमध्ये वावर वाढला असून या हत्तींनी शेतकऱ्यांच्या बागांचे मोठे नुकसान केले आहे.

कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार

- महावितरणचा वीज ग्राहकांना झटका, जुलै महिन्याच्या वीज वापरावर इंधन शुल्क लागू केल्याने घरघुती ग्राहकांना प्रति युनिट 10 ते 60 पैसे अतिरिक्त द्यावे लागणार

- यामुळे महावितरणच्या ग्राहकांचे ऑगस्ट महिन्याचे वाढीव बिल येणार

- कृषी वीज वापरावरही प्रति युनिट 15 आणि 25 पैसे इंधन समायोजन शुल्क लागू केले आहे,मात्र शेतकऱ्यांच्या वीज बिलाची रक्कम सरकार देत असल्याने राज्य सरकारच्या आर्थिक भारात वाढ होणार आहे

Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

पुण्यातील पक्ष कार्यालयात राज ठाकरे घेणार बैठक

राज ठाकरेंच्या उपस्थितीत शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांची होणार बैठक

सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन

Solapur : तृतीयपंथीयांचे अनोखे आंदोलन, महावितरणने स्मार्ट मीटर काढताच गोंधळ शांत

तृतीयपंथीयांचे अनोखे आंदोलन, महावितरणने स्मार्ट मीटर काढताच गोंधळ शांत

तृतीयपंथीयांनी महावितरण कार्यालया समोर ठिय्या करत नोंदवला निषेध

Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट

जपतलाई दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाईचे आदेश; ५१३ आश्रमशाळांची तीन महिन्यांत तृतीय पक्षीय तपासणी

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची जपतलाई आश्रमशाळेला भेट; १५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्याचे निर्देश

विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड

- विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने पावसाचा बॅकलॉग वाढला..

- पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा परिणाम खरिपाच्या पिकावर होण्याची भीती..

- सध्या पिकांना वाढीसाठी पाण्याची गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ..

Pune : पुण्यातील महापौर निवासाचे नाव बदलू नका माजी महापौर संघटनेची मागणी

पुण्यातील महापौर निवासाचे नाव बदलू नका माजी महापौर संघटनेची मागणी

महापौर पदाची प्रतिष्ठा आणि वास्तूची ओळख कायम ठेवण्यासाठी पूर्वीचे नाव ठेवा

भाजपच्या एका नगरसेवकांनी महापौर बंगल्याचे नाव रामदूत करण्याचा प्रस्ताव दिला आहे

2008 ला ही वास्तू भरली तेव्हापासून त्याच नाव महापौर बंगलाच असल्याचं निवेदनात म्हटला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com