Nitesh Rane Speech Sangli:  Saamtv
महाराष्ट्र

Nitesh Rane News: '...तर मी आणि गोपीचंद पडळकर जेलमध्ये असू', नितेश राणेंचे सर्वात मोठे विधान; नेमकं काय म्हणाले?

Nitesh Rane Speech Sangli: मी निर्धार केला आहे आपले सरकार जाऊ द्यायचं नाही. महाराष्ट्र पिंजून काढायचं आणि भाजपाचे आणि आपल्या महायुतीचे सरकार आणून दाखवायचा निर्धार केला, असेही नितेश राणे यावेळी म्हणालेत.

Gangappa Pujari

सांगली, ता. ३० ऑगस्ट २०२४

राज्यामध्ये पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आपल्याला आणि गोपीचंद पडळकर यांना तुरुंगात जावं लागेल, असे मोठे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे. काल सांगलीमधील विटा येथे झालेल्या सभेदरम्यान ते बोलत होते. नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

काय म्हणाले नितेश राणे?

'राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आपल्याला आणि गोपीचंद पडळकरला तुरुंगात जावे लागणार आहे, असे विधान भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगलीच्या विटा येथे झालेल्या सभेत बोलताना केले. ऑक्टोंबर मध्ये विधानसभा निवडणुकीत चुकून महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्हा लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका मी आणि गोपीचंद पडळकर दोघेही सहा महिन्यात कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आणि आपसात गोट्या खेळत असू,' असेही ते यावेळी म्हणाले.

१०० दिवसात आत टाकतील

'आम्हाला तर हे लोक बाहेर ठेवत नाहीत. मला तर पहिल्या 100 दिवसात आत टाकतील, मला तर माहीत आहे. त्यामुळे मी बॅग भरून ठेवली आहे. त्यामुळे मी निर्धार केला आहे आपले सरकार जाऊ द्यायचं नाही. महाराष्ट्र पिंजून काढायचं आणि भाजपाचे आणि आपल्या महायुतीचे सरकार आणून दाखवायचा निर्धार केला. आता राजकारण राहिले नाही, गँगवॉर सुरू झाले आहे. एक दुसऱ्याला मारून टाकण्यापर्यंत विषय जातायत,' असे मोठे विधानही नितेश राणे यांनी केले.

सांगलीत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन!

दरम्यान, सांगलीच्या इस्लामपूरमध्ये काल आमदार नितेश राणे याच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतानाही नितेश राणे यांनी पोलिसांना थेट इशारा दिला. देशात पंतप्रधान हिंदू आहे, राज्यात मुख्यमंत्री हिंदू आहेत आणि गृहमंत्री देखील हिंदू आहे. त्यामुळे पोलिसांनी आपल्या डायरीत नोंद करून ठेवा. लव्ह जिहाद प्रकरणात तक्रार लिहून घेण्यासाठी वेळ का केला जातो,आणि तुम्ही कोणाची बाजू घेता? असा सवाल करत पोलिसांना इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT