Rajkot Fort Rada: मालवणमध्ये तुफान राडा; राजकोट किल्ल्यावरील घटनेवर कोण काय काय म्हणाले?

Rajkot Fort Rada: राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पडल्यानंतर राज्यातील वातावरण तापलंय. आज ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक आमनेसामने येत दोन्ही गटात हाणामारी झाली.
Rajkot Fort Rada: मालवणमध्ये तुफान राडा; राजकोट किल्ल्यावरील घटनेवर कोण काय काय म्हणाले?
Political Leader Reactions
Published On

सिंधुदुर्गमधील मालवणातील राजकोट किल्ल्यावर नौदलाने छत्रपती शिवरायांचा पुतळा काही महिन्यांपूर्वी उभारला होता. दोन दिवसापूर्वी महाराजांचा हा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेवरून राज्यभरातील राजकारण तापलं असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार हल्ला चढवलाय. दरम्यान आज राजकोट किल्ल्यावर राणे समर्थक आणि ठाकरे गट शिवसैनिक आमनेसामने आले. त्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झालीय. या घटनेनंतर अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नारायण राणे काय म्हणाले ?

दोन्ही कार्यकर्त्यांची बाचाबाची झाल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नारायण राणे यांनीही आक्रमक भूमिका घेतली. 'बाहेरील लोक दादागिरी करत असीतल. त्यांना पोलीस संरक्षण देत असतील. तर आम्ही या येथून हलणार नाही. काय करायचं का, वाटल्यास गोळ्या घाला. पण आम्ही येथून हलणार नाही, असे नारायण राणे म्हणाले.

खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही- देवेंद्र फडणवीस

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवलीय.अवघ्या आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनाच्या कार्यक्रमात शिवरायांच्या या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. विरोधकांकडून टीका होत असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केलंय.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दु:खदायक घटना आहे. यावर कोणीही राजकारण करू नये. पण या दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

भ्रष्टाचार झाला - जयंत पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अनेक लढाया झाल्या. पण त्यांनी कधीही हार पत्कारली नाही. महाराष्ट्र नावाचं राज्य निर्माण करण्याचं श्रेय दैवत शिवाजी महाराजांकडे जातं. आज दुर्दैवाने महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारी लोकांनी उभा केला आणि तो कोसळला. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतानाही भ्रष्टाचार केला, म्हणूनच ही घटना घडल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

शरद पवार

छत्रपती महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळ्यानंतर राज्यभरात संतपाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवलाय. आज कोणी म्हणतंय वाऱ्याचा वेग होता. भ्रष्टाचार केला. त्याठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचलाय. कुठे भ्रष्टाचाराची भूमिका घेऊ नये, याचं तारतम्यही यांना नाहीये. त्यासाठीच आम्ही लोकांना आवाहन करत आहोत. येत्या रविवारी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार असल्याच शरद पवार म्हणालेत.

Rajkot Fort Rada: मालवणमध्ये तुफान राडा; राजकोट किल्ल्यावरील घटनेवर कोण काय काय म्हणाले?
Deepak Kesarkar : दीपक केसरकरांनी 'दिवे लावले', दुर्घटनेत संधी शोधतायत शिक्षणमंत्री ? नेव्हीवर खापर फोडल्यानं विरोधकांचाही निशाणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com