Special Report : भ्रष्टाचाराची गाडी, RTO ड्रायव्हर; बोगस लायसन्सचा अंधेरीत सुळसुळाट

RTO/Mumbai News : अंधेरीतील आरटीओ कार्यालयात तब्बल125 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत वडेट्टीवारांनी लायसन्स घोटाळ्याची यादीच वाचून दाखवलीय. पुण्यातील पोर्शे अपघातानंतर आरटीओचा गैरकारभार चर्चेत आला.
Special Report
Special ReportSaam Digital

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

राज्यातील आरटीओतील घोटाळ्याची प्रकरणं सातत्याने समोर येतात. मात्र आता अंधेरीतील आरटीओ कार्यालय कसं भ्रष्टाचाराचा अड्डा बनलंय? यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारला घेरलंय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

पुण्यातील पोर्शे अपघातानंतर आरटीओचा गैरकारभार चर्चेत आला. आरटीओच्या कार्यालयातील घोटाळे काही नवे नाहीत. त्यातच अंधेरीतील आरटीओ कार्यालयात तब्बल125 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत वडेट्टीवारांनी लायसन्स घोटाळ्याची यादीच वाचून दाखवलीय.

2023-24 मध्ये अंधेरी आरटीओने 1 लाख 4हजार लायसन्स वाटप केले. यापैकी 76 हजार 354 लायसन्स अवैध वाहनांवर चाचणी करून देण्यात आले. यात दुचाकी आणि कार अशा 4 वाहनांवर स्कुटरपासून ते क्रेनपर्यंत बोगस लायसन्स देण्यात आले. दोन बाईकवर तब्बल 41 हजार 93 ड्रायव्हिंग लायसन्स दिले आहेत. 2 कारवर 35 हजार 261 ड्रायव्हिंग लायसन्स दिले आहेत. गिअर नसलेल्या बाईकसाठी तब्बल 36 हजार 319 बोगस लायसन्स दिल्याचा आरोप करण्यात आलाय.

Special Report
Nandurbar News : शेततळ्याचं अनुदान मिळवून देण्यासाठी शेतकऱ्याकडे मागीतली २५ हजारांची लाच; कृषी अधिकारी रंगेहाथ सापडला जाळ्यात

लायसन्ससाठी ड्रायव्हिंग टेस्ट दिल्यानंतरच संबंधितांना लायसन्स दिले जाते.मात्र अंधेरी आरटीओने वाहन चालवण्याच्या चाचणीची प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी केवळ कागदोपत्री नोंद केली की खरंच चाचण्या घेतल्या? असा प्रश्न निर्माण झालाय. ठाण्यापासून जवळच असलेल्या अंधेरीत 125 कोटींचा लायसन्स घोटाळा झालाय. मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या परिवहन खात्याकडे आहे. त्यामुळे हा घोटाळा मुख्यमंत्र्यांवरील भार कमी करण्यासाठी आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय.

पोर्शे प्रकरणानंतर आरटीओचा गैरकारभार चर्चेत आला होता. चुकीच्या पद्धतीने लायसन्स देणं हे अनेकदा रस्ते अपघाताला कारणीभूत ठरतं. त्यामुळे लोकांच्या जीवाची पर्वा करून सरकारने आरटीओला लागलेल्या किडीचा नायनाट करायला हवा. अन्यथा ही कीड आरटीओला पोखरत राहील आणि रस्ते अपघातात नागरिकांचे बळी जात राहतील.

Special Report
VIDEO : पुण्यात वाढला 'झिका'चा धोका! चौथा रुग्ण आढळल्यानं खळबळ; टेन्शन नको, अशी घ्या काळजी!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com