Monsoon 2025 Arrives in Andaman Saam Tv
महाराष्ट्र

Monsoon 2025: आनंदवार्ता! अखेर मान्सून अंदमानमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधीपर्यंत येणार?

Monsoon 2025 Arrives in Andaman: मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे. लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होऊन तळकोकणामार्गे महाराष्ट्रात दाखल होणार आहे. महाराष्ट्रात मान्सून कधीपर्यंत पोहचेल याची तारीख देखील हवामान खात्याने सांगितली आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे. पुणे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून आज अंदमानमध्ये दाखल झाला आहे. १ जूनला मान्सून भारतामध्ये दाखल होईल. त्यानंतर ५ जूनला मान्सून कोकणामार्गे महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे. १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सून आज अंदमानमध्ये दाखल झाला. मान्सूनची वाटचाल यंदा वेगाने सुरू आहे. मान्सून सरासरी वेळेच्या ५ दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. मान्सूनने दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्राचा काही भाग, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत वाटचाल केली आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून आणखी काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

निकोबार बेटांवर मागील २४ तासांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर मागील २ दिवसांमध्ये काही भागात सर्वदूर पाऊस पडत आहे. मागील २ दिवसांमध्ये पश्चिमी वाऱ्यांचा वेग आणि खोली दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात वाढला आहे. पश्चिमी वाऱ्यांचा वेग समुद्राच्या सरासरी पातळीच्या १.५ किलोमीटर उंचीवर २० नॉट्सपेक्षा अधिक आहे. तर दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात पश्चिमी वाऱ्यांची खोली ४.५ किलोमीटर उंचीवर आहे.

मान्सून आज दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्रात, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाल्याचे हवामान विभागाने आज जाहीर केले आहे. तसेच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा काही भाग तसेच दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे, उरलेला अंदमान समुद्राचा भाग आणि बंगालाच्या उपसागराच्या काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, विश्वासू शिलेदार राजकारणातून निवृत्त

Cancer symptoms risk: कधीही कळून येत नाहीत अशी लक्षणं, वाटतात साधी, पण असतात गंभीर; असू शकतो कॅन्सरचा धोका

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Viral : नवऱ्याची ५००हून अधिक अफेअर्स, वैतागलेल्या बायकोने कॉमिकमधून मांडल्या व्यथा; नेमकं काय प्रकरण? वाचा

Gold Jewellery: सोनार गुलाबी रंगाच्या कागदात सोने गुंडाळून का देतो? यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT