Gold Rate Today Saam Tv
महाराष्ट्र

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; सुवर्णनगरीतील २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

Gold Rate Today Fall: सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरल्याने खरेदीदारांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर घसरले

जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोनं झालं स्वस्त

वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर

संजय महाजन, साम टीव्ही प्रतिनिधी

अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. सोन्याच्या दरात ८०० रुपयांची घसरण झाली आहे तर चांदीदेखील ५००० रुपयांनी घसरली आहे. सोन्याचे दर घसरल्याने मात्र खरेदीदांराना दिलासा मिळाला आहे.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहे. या दिवसात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. सोन्याचे दागिने बनवले जातात. परंतु सध्या सोन्याचे दर खूप झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्नच पडला आहे. याच दरात किंचिंत घसरण झाली असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today 24K Rates)

जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५६ हजार रुपयांवर गेले आहेत. तर १ किलो चांदीचे दर २ लाख ६२ हजार ६५० रुपयांवर आहेत. सोन्याचे दर जरी घसरले असले तरी ते दीड लाखांपेक्षा जास्त आहेत.

जळगावात अक्षय्य तृतीयेला सराफा बाजारात ६० कोटींचा उलाढाल

अक्षय्य तृतीयेला शहराचे तापमान ४१.६ अंश असतानाही विविध शो रुम आणि सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दी दिसून आली. सराफा बाजारपेठेत ५५ ते ६० कोटींची उलाढाल रविवारी सोने १,५७,६९३ रुपये तोळा तर चांदी २,६७,८०० रुपये किलो होती. दरवाढीमुळे यंदा सोने, चांदीची खरेदी कमी होईल असा अंदाज ग्राहकांनी खोटा ठरवला. सुरक्षित गुंतवणूक आणि मुहूर्तावरील विश्वासाने ग्राहकांचा अर्धा ग्रॅमपासून दोन तोळ्यापर्यंत सोने खरेदीकडे कल दिसून आला. लग्नसराई सुरू असल्यामुळे अनेकांनी मणी मंगळसूत्राला प्राधान्य दिले. त्याचबरोबर नेकलेस, सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चेन, अंगठीसह सर्व प्रकारचे दागिने खरेदीसाठी उत्साह दिसून आला. त्यामुळे सराफा बाजारात दिवसभरात ५५ ते ६० कोटींची उलाढाल झाल्याचे व्यावसायिक आकाश भंगाळे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरसह विदर्भातील इतर ४ जिल्ह्यांसाठी आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

Salman Khan : "राजकारण करू नका..."; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सलमान खानचा फुल पाठिंबा, पाहा भाईजान नेमकं काय म्हणाला?

Ladki Bahin Yojana : जूनचा हप्ता १५ जुलैला आला, मग जुलैचे १५०० कधी? ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट

8th Pay Commision : २.० फिटमेंट फॅक्टरमुळे तुमच्या पगारात होईल दुप्पट वाढ, कशी? जाणून घ्या सविस्तर

Rain Alert : कुठे रेड अलर्ट, तर कुठे ऑरेंज अलर्ट? पुढील ४८ तास राज्यात अति मुसळधार पावासाचा अंदाज, IMD कडून अलर्ट

SCROLL FOR NEXT