Manasvi Choudhary
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
साडेतीन मुहूर्तापैंकी एक अक्षय्य तृतीया हा सण अत्यंत शुभ मानला जातो.
अक्षय्य तृतीया हा सण सोने खरेदी करण्यासाठी शुभ दिवस आहे.
मंगळसूत्र हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. लग्नानंतर बायकोला गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही मंगळसूत्र भेट देऊ शकता. मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स कोणत्या आहेत? ते पाहूया.
ट्रेडिशनल गोल्ड मंगळसूत्र हे महिलांसाठी कायमच आकर्षण असते. काळे मणी आणि सोन्याच्या चैनमध्ये हे मंगळसूत्र गुंफलेले असते.
डायमंड मंगळसूत्र हे डिझायनर मॉडर्न लूकसाठी आहे. ड्रेस, कुर्तीवर महिला डायमंड मंगळसूत्र घालतात.
मिनिमल डिझाइन सध्या ट्रेंडमध्ये आहे. नाजूक आणि सिंपल डिझाईनमध्ये तुम्ही मिनिमलिस्ट मंगळसूत्र निवडू शकता.
पेडंट मंगळसूत्र डिझाईनमध्ये तुम्ही विविध डिझाईनचे पेडंट निवडू शकता. यात तुम्ही फ्लोरल, मोर, पतीच्या नावाचे पेडंट निवडू शकता.
next: