Manasvi Choudhary
काही आरोग्याच्या समस्या छोट्या छोट्या वाटत असल्या तरी गंभीर आजाराचं संकेत देत असतात.
कॅन्सर सारख्या गंभीर आजाराची लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो त्या समस्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.
भूक कमी होणे ही समस्या सामान्य वाटली तरी दुर्लक्ष करू नका.
कोणतेही कारण नसताना वजन अचानक कमी होणे हे देखील कॅन्सरचे सुरूवातीचे लक्षण असू शकते वेळीच लक्ष देणे महत्वाचे आहे.
विश्रांती घेतल्यानंतरही कायम थकल्यासारखे वाटणे, अशक्तपणा वाटत असेल तर हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते.
वारंवारं ताप येणे, सहसा रात्री ताप आणि घाम येणे हे कॅन्सरचे सुरूवातीचे लक्षण आहे.
डोळे पिवळे होणे हे कावीळचे लक्षण असले तरी कॅन्सर सारख्या आजारांमध्ये देखील डोळ्यांचा रंग बदलणे, डोळ्यांमध्ये फोड येणे या समस्या दिसतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या