अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण
१० तोळा सोनं तब्बल ४,९०० रुपयांनी स्वस्त
२२, २४ आणि १८ कॅरेट दरात घसरण
चांदीचे दर मात्र स्थिर
Gold Rate Today: अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात बदल झाला आहे. सोनं स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना आज खरेदीची चांगली संधी आहे. आज १० तोळा सोनं ४,९०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर आज चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. आज सोनं आणि चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर किती ते जाणून घ्या...
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४९० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,५५,२९० रुपये खर्च करावे लागतील. तर आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,९०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं आज १५,५२,९०० रुपयांना विकले जात आहे. रविवारी हे सोनं १,५५,७८० रुपयांना विकले गेले.
२२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील आज घसरण झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरात ४५० रुपयांची घसरण झाली. हे सोनं १,४२,३५० रुपयांना विकले जात आहे. तर आज २२ कॅरेटचे १० तोळा सोनं आज ४,५०० रुपयांची स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १४,२३,५०० रुपये खर्च करावे लागतील. रविवारी हे सोनं १४,२८,००० रुपयांना विकले गेले.
२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरात ३७० रुपयांची घसरण झाली. हे सोनं १,१६,४७० रुपयांना विकले जात आहे. तर आज १८ कॅरेटचे १० तोळा सोनं आज ३,७०० रुपयांची स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ११,१६,४७० रुपये खर्च करावे लागतील. रविवारी हे सोनं ११,६८,४०० रुपयांना विकले गेले.
दरम्यान, आज सोन्याच्या दरात घसरण झाली पण चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज १ ग्रॅम चांदी २७५ रुपयांना विकली जात आहे. तर १ किलो चांदी २,७५,००० रुपयांना विकली जात आहे. आज सोन्याचे दर घसरल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज सोनं आणि चांदी दोन्ही खरेदी करण्याची चांगली संधी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.