Gold Rate Today: खुशखबर! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं झालं स्वस्त; प्रति तोळ्यामागे इतक्या रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today Fall: सोन्याचे दर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरले आहेत. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांनी घसरले आहेत. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर घसरले

प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांची घसरण

सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. लग्नसराईच्या काळात सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांचा जास्त कल असतो. दरम्यान, सध्या सोने चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर वाढले होते. त्याआधी सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली होती. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांनी घसरले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate : खरेदीदारांचे टेन्शन वाढणार; ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात मोठा बदल; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

सोन्याचे दर आज घसरले (Gold Rate Today Fall)

सोनं ही एक गुंतवणूक आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दरातील गुंतवणूक ही कधीच तोट्याची ठरत नाही. तुम्हाला नेहमीच फायदा होतो.त्यामुळे सोनं घेण्यासाठी खरेदीदारांची नेहमी गर्दी पाहायला मिळते. मात्र, मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे दर दीड लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे खरेदीदारांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आजचे सोने चांदीचे दर जाणून घ्या.

२४ कॅरेटचे दर (24K Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५२,४६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३०४ रुपयांनी घसरले असून १,२१,९६८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ३,८०० रुपयांनी घसरले असून १५,२४,६०० रुपये झालं आहे.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,३९,७५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं २८० रुपयांनी स्वस्त झालं असून हे दर १,११,८०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ३५०० रुपयांची घसरण झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २९० रुपयांनी घसरले असून १,१४,३४० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २३२ रुपयांनी घसरले आहेत. हे दर ९१,४७२ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं २९० रुपयांनी स्वस्त झालं असून १,१४,३४० रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २,९०० रुपयांनी घसरले असून ११,४३,४०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate: सोनं-चांदीने उच्चांक गाठला, आठवडाभरात किती रुपयांनी वाढले, वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com