आठवडाभरात सोनं १९१० रुपयांनी महागलं
चांदीच्या दरात तब्बल १०,००० रुपयांची वाढ
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा दरांवर परिणाम
प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर उच्च पातळीवर
आखाती देशांमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सोनं-चांदीच्या दरावर झाला होता. आता युद्ध दोन आठवड्यांसाठी थांबलं असलं तरी देखील सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. या आठवडाभरात सोनं १९१० रुपयांनी महाग झाले. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल १०००० रुपयांनी वाढ झाली. या आठवड्यात सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार असल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी होती.
या एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचे दर १९१० रुपयांनी वाढले. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात १७५० रुपयांची वाढ झाली आहे. आज राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा १ तोळा सोन्याचे दर १५२९९० रुपये इतके आहे. मुंबईत १ तोळा सोनं १५२८४० रुपयांना विकले जात आहे. शुक्रवार १० एप्रिल रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव ४०० रुपयांनी वाढून प्रति तोळा १,५५,३०० रुपयांना विकला गेला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस ४,७७७.१७ डॉलर इतका आहे.
सोन्यापाठोपाठ या आठवड्यात चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली. चांदी तब्बल १०,००० रुपयांनी महाग झाली आहे. आज चांदीचा भाव २,६०,००० रुपये प्रति किलोग्राम इतका आहे. शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात १ किलो चांदीच्या दरामध्ये ३,८०० रुपयांनी वाढ होऊन ती २,४७,००० रुपयांना विकली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव ७५.९१ डॉलर प्रति औंस आहे. यावर्षी जानेवारीमध्ये देशात चांदीच्या भावाने ४ लाख रुपयांचा आकडा ओलांडला होता.
दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १ तोळा १,५२,९९० रुपये इतका आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १,४०,२५० रुपयांना विकले जात आहे.
सध्या मुंबई आणि कोलकातामध्ये २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १,४०,१०० रुपयांना विकले जात आहे. तर २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,५२,८४० रुपये इतके आहे.
चेन्नईमध्ये २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १,५४,१०० रुपयांना विकले जात आहे. तर २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव १,४१,२६० रुपये इतका आहे.
पुणे आणि बंगळुरू या दोन्ही शहरांमध्ये २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याची किंमत १,५२,८४० रुपये इतकी आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १ तोळा १,४०,१०० रुपये इतके आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.