

अमेरिक इराण युद्ध २ आठवड्यांसाठी थांबलं
तिकडे युद्ध थांबलं इकडे सोन्याच्या दरात वाढ
सोन्याचे दर अवघ्या काही तासात ४ हजारांनी महागलं
इराण-इस्त्रायल युद्धाला पूर्णविराम देण्याची घोषणा होताच संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. एकीकडे शेअर मार्केटमध्ये वाढ होत आहे, कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. त्यानंतर सोन्याच्या दरातदेखील वाढ होत आहे. इराण- इस्त्रायलमध्ये युद्ध थांबवण्याची घोषणा होताच सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
सोनं-चांदीच्या दरात वाढ (Gold Silver Price Hike)
अमेरिका इजरायल मध्ये सिजफायरची घोषणा झाली. त्यानंतर अवघ्या काही तासातच सोने-चांदीच्या किंमती वाढल्या. जळगावातील सराफा बाजारपेठेत सोन्याच्या दरात ४ हजार रूपयांनी तर चांदीच्या दरात ही ११ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा सोने खरेदी करायचे की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)
सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५६ हजार ५६० रुपयांवर आले आहेत. चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ५४ हजार ४१० रुपयांवर आले आहे. युद्ध पूर्णपणे थांबण्याची घोषणा झाल्यास सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ होण्याचा सराफ व्यावसायिकांचा अंदाज आहे.
गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असलेल्या सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, अचानक काही तासात सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली. यामुळे ऐन लग्नसराईत खरेदीदारांच्या खिशाला फटका बसणार आहे.
मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर चांगलेच घसरले होते. १ लाख ४० हजारांच्या घरात आले होते. ऐन लग्नसराईत सोन्याचे दर घसरल्याने अनेकजण सोनं खरेदी करत होते. मात्र, आता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली आहे. काही तासात सोनं ४००० रुपयांनी महागलं आहे. त्यामुळे पुन्हा एकगा चिंता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.