Gold Rate Today Saam Tv
महाराष्ट्र

Gold Rate Today: सोन्याला चकाकी! सोन्याचे दर १०००० रुपयांनी वाढले; सुवर्णनगरीतील 22K आणि 24K चे आजचे दर किती?

Gold- Silver Rate Today: जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. आज चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. सुवर्णनगरीत आज १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर किती आहेत ते घ्या जाणून....

Priya More
  • आजचा सोन्याचा दरात मोठी वाढ

  • जळगावच्या सराफा बाजारात सोनं महागलं

  • सोन्याचे दर १ लाख ६० हजारांवर पोहचले

  • चांदीचे दर आज स्थिर आहेत

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरामध्ये सतत चढ-उतार होत आहे. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठा बदल झाला आहे. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क वाढल्यानंतर सोनं– चांदीच्‍या दराने उसळी घेतली होती. आज मात्र थोडा दिलासा असून सोन्‍याचे दर १००० रूपयांनी वाढले. तर चांदीच्या दरात मात्र आज कोणताही बदल पाहण्यास मिळाला नाही.

गेल्या ३ दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होत होती. आजही सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सोने-चांदीचा भाव ठरत असतो. जागतिक बाजारात रूपयाची किंमत घसरली आहे. त्याशिवाय इंधनाच्या तुटवड्यामुळे सराफा बाजारामध्ये खळबळ उडाली आहे. १३ मे रोजी सोनं- चांदीच्‍या दराने मोठी उसळी घेतली होती.

जळगावच्या सराफा बाजारात बुधवारी २४ कॅरेटचे १ तोळा सोन्‍याच्‍या दरात ७५०० रुपयांची वाढ होऊन सोनं १ लाख ५९ हजार रुपयांवर पोहचले होते. आज सोन्याच्या दरात पुन्हा १००० रुपयांची वाढ झाली आहे. तर १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १०००० रुपयांची वाढ झाली. आज २४ कॅरेटचे १ तोळा सोने १ लाख ६० हजार रूपयांवर पोहचले. १ तोळा सोनं खरेदीसाठी खरेदीसाठी जीएसटीसह १ लाख ६४ हजार ८०० रूपये द्यावे लागणार आहे. दुसरीकडे बुधवारी चांदीच्‍या दरात १६ हजारांची वाढ होऊन प्रतिकिलो चांदी विनाजीएसटी २ लाख ९२ हजारांवर पोहोचली. आज चांदीचे दर स्थिर आहेत.

१ तोळा सोन्याचे आठवडाभरातील दर - (विनाजीएसटी)

६ मे - १ लाख ५० हजार रुपये

७ मे - १ लाख ५१ हजार ५०० रुपये

९ मे - १ लाख ५० हजार ८०० रुपये

११ मे - १ लाख ५० हजार रुपये

१२ मे - १ लाख ५१ हजार ५०० रुपये

१३ मे - १ लाख ५९ हजार रुपये

१४ मे - १ लाख ६० हजार रुपये

१ किलो चांदीचे आठवडाभरातील दर - (विनाजीएसटी)

६ मे - २ लाख ४९ हजार रुपये

७ मे - २ लाख ५७ हजार रुपये

९ मे - २ लाख ६० हजार रुपये

११ मे - २ लाख ५९ हजार रुपये

१२ मे - २ लाख ६९ हजार रुपये

१३ मे - २ लाख ८५ हजार रुपये

१४ मे - २ लाख ९३ हजार रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT