Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; ₹६००० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today Fall: सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सलग पाचव्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. आज सोन्याच्या दरात ६०० रुपयांची घसरण झाली आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण

ऐन लग्नसराईत चांदीही झाली स्वस्त

सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा

Gold Rate Today: ऐन लग्नसराईत सोने खरेदीसाठी खरेदीदारांची गर्दी असते. लग्नसराईत सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. दरम्यान, आज सलग पाचव्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचे भाव ६००० रुपयांची घसरण झाली आहे.

आज सोन्याचे दर घसरल्याने आज सोने खरेदीची तुमच्याकडे संधी आहे. सोन्यासह चांदीचेही दर घसरले आहेत. दरम्यान, आजचे सोने-चांदीचे दर वाचा.

Gold Rate Today
Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; सुवर्णनगरीतील २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

२४ कॅरेटचे दर (24K Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५२,९५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ४८० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,२२,३६० रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ६००० रुपयांची घसरण झाली असून १५,२९,५०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,४०,२०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ४४० रुपयांनी घसरण होणार आहे. हे दर १,१२,१६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ५,५०० रुपयांची घसरण झाली असून हे दर १४,०२,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर (18K Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ४५० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,१४,७१० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३६० रुपयांनी घसरले असून हे दर ९१,७६८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ४५०० रुपयांनी स्वस्त झालं असून ११,४७,१०० रुपये किंमत झाली आहे.

Gold Rate Today
Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात घसरण; १० तोळ्यामागे २३,४०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

चांदीचे दर (Silver Rate)

आज चांदीच्या दरातदेखील किंचिंत घसरण झाली आहे. चांदीच्या दरात १ किलोमागे फक्त १०० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर २,५९,९०० रपये झाले आहेत. १०० ग्रॅममागे सोन्याचे दर १० रुपयांनी घसरले असून हे दर २५,९९० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate: खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले; प्रति तोळ्यामागे इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com