Gold Rate: खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले; प्रति तोळ्यामागे इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Gold Rate Today Jalgaon: जळगावच्या सराफ बाजारपेठेत सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सराफ बाजारपेठेत सोन्याचे दर १२०० रुपयांनी घसरले आहेत. आजचे सोन्याचे दर किती आहेत ते जाणून घ्या.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर घसरले

जळगावच्या सराफ बाजारपेठेत सोनं झालं स्वस्त

वाचा आजचे दर

रोज सोने-चांदीचे नवीन दर जाहीर होतात. जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदीला चांगलीच मागणी आहे. रोज सराफ बाजारपेठेत सोन्याचे नवे दर जाहीर होतात. आज सोन्याच्या दरात चांगलीच घसरण पाहायला मिळणार आहे. सोन्याचे दर सलग २-३ दिवसांपासून घसरताना दिसत आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १२००० रुपयांनी झालं स्वस्त, 18K, 22K आणि 24K चे आजचे दर किती?

मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली होती. त्यानंतर आता सोन्याचे दर सातत्याने घसरत असल्याने खरेदीदारांना थोडासा दिलासा मिळाला आहे. ऐन लग्नसराईत सोने खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. मे महिन्यात लग्नाचे खूप मूहूर्त आहेत. त्यामुळे लग्नघरात सोन्याची खरेदी जास्त प्रमाणात केली जाते. सोन्याचे दर अजून कमी होण्याची आशा सर्वसामान्यांना आहे.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्यासह चांदीचेही दर घसरले आहेत. सोन्याच्या दरात १२०० रुपयांची तर चांदीच्या दरात ५००० रुपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळा एसटीसह १ लाख ५५ हजार ५३० रुपयांवर आहेत. तर चांदीचे दर प्रति किलो २ लाख ५५ हजार ४४० रुपयांवर आहेत.

Gold Rate Today
Gold Rate: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, ४९०० रुपयांनी झालं स्वस्त; २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

सोन्याचे दर जरी घसरत असले तरीही ते दीड लाखांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे हे सामान्य कुटुंबातील व्यक्तींना परवडणारे नाही. मध्यंतरी आखाती देशांमधील युद्धाच्या काळात सोन्याचे दर घसरले होते तेव्हा थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, युद्ध थांबवल्यानंतर पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे भविष्यात सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gold Rate Today
Gold Rate: सोनं २ लाखांवर पोहोचणार? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com