सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, आज खरेदीचा 'गोल्डन चान्स'; 18K, 22K आणि 24K चे दर किती?

gold rate india : ऐन लग्नसराईत सोनं स्वस्त झालं आहे. आजच दागिने खरेदीचा 'गोल्डन चान्स' आहे. जाणून घ्या आजचा दर
gold rate news
gold rate Saam tv
Published On
Summary

सोन्याचा दरात आज घसरण

सोन्यात गुंतवणूणकीसाठी गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेने दिसतोय परिणाम

Gold price today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अमेरिका-इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या दरावर होतोय. काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या युद्धबंदीमुळे सोन्याचे भाव वधारले होते. परंतु आज बुधवारी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण पाहायला मिळाली. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव कोसळ्याने ग्राहक आणि गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सराफा बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५४० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर प्रति तोळा १५४,७५० रुपयांवर पोहोचला आहे. तर १० तोळे सोन्याचा दर ५४०० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळालाय.

gold rate news
Gold Rate Today : सोन्याच्या दरात वाढ; 1 तोळ्यामागे 2000 रुपयांची वाढ, काय आहे आजचा ताजा भाव ?

सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०० रुपयांनी कोसळल्याने प्रति तोळा १४१८५० रुपयांवर पोहोचला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दर ४१० रुपयांनी कोसळून प्रति तोळा ११६०६० रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याचा आज आणि कालच्या दरात ४१० रुपयांचा फरक पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरातही मोठा फरक पाहायला मिळत आहे.चांदी प्रति किलो २६५००० रुपयांवर पोहोचली आहे.

gold rate news
Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहचले, वाचा 22k-24k चे ताजे दर

इराण-अमेरिकेने काही दिवस शस्त्रसंधी जाहीर केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारही सोन्याच्या दरावर परिणाम पाहायला मिळाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्याने कच्च्या तेलाच्या दरातही घसरण पाहायला मिळाली होती.

तत्पूर्वी, सुरक्षित गुंतवणूक आणि मुहूर्तावरील विश्वासाने ग्राहकांचा सोन्यात गुंतवणूक करण्याकडे ओढा आहे. लग्नसराईमुळे अनेकांनी मणी मंगळसूत्राला प्राधान्य दिलंय. मागील काही दिवसांपासून ग्राहकांमध्ये नेकलेस, सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चेन, अंगठीसह सर्व प्रकारचे दागिने खरेदीसाठी उत्साह पाहायला मिळत आहे. त्यात सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव कोसळल्याने दिवसभरात कोटींची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com