Shocking : मित्रासोबत निर्जन ठिकाणी बसलेल्या तरुणीसोबत दिवसाढवळ्या भयंकर घडलं, नागपुरात खळबळ

Nagpur Crime News : नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणातील आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू.
Nagpur Sonegaon forest area crime
Nagpur Sonegaon forest area crime AI Image
Published On: 

नागपूर शहरातील सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मित्रासोबत निर्जन ठिकाणी बसलेल्या तरुणीला एका अज्ञात तरुणाने लक्ष्य केले. आधी तिच्या मित्राला मारहाण करून तेथून पळवून लावले आणि त्यानंतर तरुणीवर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी २३ तारखेला दुपारच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित तरुणी आपल्या मित्रासोबत सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगल परिसरात बसली होती. त्याचवेळी एक तरुण तिथे आला. त्याने कोणतेही कारण नसताना तरुणीच्या मित्रासोबत वाद घातला. त्यानंतर त्याला मारहाण करून तिथून निघून जाण्यास भाग पाडले.

Nagpur Sonegaon forest area crime
Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीही ४००० रुपयांनी महागली; वाचा आजचे दर

मित्र तिथून गेल्यानंतर आरोपीने तरुणीला धमकावले आणि तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. मात्र, तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला. तरीही आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करत अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. मंगळवारी २४ तारखेला संध्याकाळी सोनेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Nagpur Sonegaon forest area crime
Bank Update : १ जानेवारीपासून ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा बंद होणार? काय आहे नेमकं सत्य? वाचा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. निर्जन ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागपूर शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.