Manasvi Choudhary
सोने- चांदी खरेदी करणाऱ्यासाठी महत्वाची माहिती आहे. केंद्र सरकारने सोने- चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.
सोन्यावरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. बेसिक कस्टम ड्युटी ५ टक्क्यांनी वाढवून १० टक्के केली आहे.
१३ मे म्हणजेच आजपासून हा निर्णय लागू होणार असून आता सोने आणि चांदीवर १५ टक्के आयात शुल्क लागू होणार आहे.
या निर्णयामुळे सोनं आणखी महागणार आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ होणार आहे. सोन्याच्या आयात शुल्कात वाढ झाल्याने आजपासून बाजारात 24 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
कालच्या भावानुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 1,54,750 रूपये होती जुन्या 6% आयात शुल्कानुसार यावर सुमारे 9,285 रूपये शुल्क लागत होते त्यामुळे एकूण किंमत 1,64,035 रूपये इतकी होत होती.
मात्र नव्या 15% शुल्कानुसार थेट 23,212 पर्यंत पोहोचणार असून सोन्याची लँडेड किंमत थेट 1,77,962 पर्यंत पोहोचणार.
म्हणजेच प्रति तोळा सोन्यासाठी आता जवळपास 14 हजार रूपये प्रति ग्रॅमसाठी 1400 रूपये जास्तीचे मोजावे लागणार आहे.