Manasvi Choudhary
डायबिटीज असणाऱ्या रूग्णांना त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये विशेष लक्ष द्यावे लागते.
कारण तुम्ही जे पदार्थ खाता त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होतो यामुळे डायबिटीजच्या रूग्णांनी आहाराची काळजी घेणे महत्वाचे आहे.
डायबिटीज असलेले रूग्ण नाश्त्याला ब्रेड खाऊ शकतात का? याविषयी या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ज्यांना डायबिटीज आहे अश्या व्यक्तींनी नाश्त्याला मल्टी ग्रेन ब्रेड खाणे योग्य आहे.
मल्टी ग्रेन ब्रेड हा पोषणतत्वांनी परिपूर्ण असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मल्टी ग्रेन ब्रेड हा गव्हाचे पीठ, बाजरी, ओट्स आणि जवस यापासून बनवला जातो.
याशिवाय तुम्ही राय ब्रेड खाऊ शकता. तसेच तुम्ही होल ओट्स ब्रेड खाऊ शकता जो ओट्सपासून बनवला जातो.
यामुळे शरीराला फायबर, व्हिटॅमिन्स बी ही पोषणतत्वे मिळतात ज्यामुळे शरीरातील शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.