Jalgaon Gold Price Today Saam Tv
महाराष्ट्र

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठा बदल, आज महाग झालं की स्वस्त? वाचा 18- 22 आणि 24 कॅरेटचे दर

Jalgaon Sarafa Market Gold Price Today: जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला. सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. वाचा आजचे दर किती आहेत...

Priya More
  • जळगावमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ

  • जळगावच्या सुवर्ण बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल

  • सोन्याच्या दरात आज १७०० रुपयांची वाढ

  • चांदीच्या दरात आज ३००० रुपयांची वाढ

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदीच्या दराच्या घसरणीला ब्रेक लागला. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात घसरण होत होती. पण आज सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. जळगावच्या सुवर्णनगरीत आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. सलग ३ दिवस दरात घसरण झाल्‍यानंतर आता सोनं-चांदीचे दर वाढले. सुवर्णनगरीत आज सोने १७०० रूपयांनी तर चांदी ३००० रूपयांनी महाग झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्‍याने होत असलेल्‍या बदलाचा परिणाम सोनं- चांदीच्या बाजारात सातत्‍याने होत आहे. गेल्‍या आठवड्याच्‍या सुरुवातीपासूनच सोनं-चांदीचे भाव कमी झाले हेाते. हेच चित्र या आठवड्यात देखील कायम राहिले. आठवड्याच्या पहिल्‍या ३ दिवसांत सोनं– चांदीचे दर कमी झाले होते. दरम्‍यान बुधवारी दरात मोठी घसरण झाल्‍यानंतर सायंकाळी चांदीच्‍या दरात पुन्‍हा वाढ झाली होती. यानंतर आज सोनं आणि चांदीचे दर पुन्‍हा वधारले आहेत.

बुधवारी २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा विना जीएसटी भाव १ लाख ५१ हजार ८०० रुपयांवर राहिला होता. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या भावामध्ये १ हजार ७०० रूपयांची वाढ होऊन दर १ लाख ५३ हजार ५०० रूपयांवर आले आहेत. तर बुधवारी प्रति किलो चांदीचा विना जीएसटी भाव २ लाख ३५ हजार रुपये इतका होता. त्यात गुरूवारी १ किलो चांदीच्या दरामध्ये ३ हजारांची वाढ होऊन चांदीचा भाव २ लाख ३८ हजार प्रति किलो इतका झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा येथील टोल वसूली बंद होणार

डीजेवरून पुण्यात दणदणाट, दुसरीकडं नागपुरात आयुक्त विश्वास नांगरे पाटलांनी थेट बंदी आदेश काढला

Gokulashtami 2026 : जन्माष्टमीला बाळ श्रीकृष्णाच्या जन्मानंतर काकडी का कापली जाते? 99 टक्के लोकांना माहीत नाही यामागची अख्यायिका?

Mosquitos Bite : डासांचे तुमच्यावरच एवढं प्रेम का? तुम्हालाच डास जास्त का चावतात? जाणून घ्या त्यामागील भन्नाट कारण

Today's Horoscope : कृष्णकृपा! गोकुळाष्टमीला 'या' ७ राशींचे नशीब चमकणार; धनलाभ आणि प्रमोशनचा योग

SCROLL FOR NEXT