Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं २१५०० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Gold- Silver Price Today: जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आजचे दर किती ते घ्या जाणून...
Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं २१५०० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर
Gold Price TodaySaam Tv
Published On
  • जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण

  • सोनं-चांदी सलग पाचव्या दिवशी झालं स्वस्त

  • १० तोळे सोनं २१५०० रुपयांनी स्वस्त

  • १ तोळा चांदीच्या दरामध्ये ४००० रुपयांची घसरण

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी सध्या खरेदीची सुवर्णसंधी आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरामध्ये घसरण होताना पाहायला मिळत आहे. आज सलग पाचव्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झााली आहे. जळगावच्या सराफा मार्केटमध्ये आज १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २१५० रुपयांनी घसरण झाली. तर १ तोळा चांदीच्या दरामध्ये ४००० रुपयांची घसरण झाली आहे.

जळगावच्या सुवर्ण बाजारात गेल्या आठवड्याच्‍या शेवटी सोनं-चांदीचे भाव कमी झाले होते. दोन दिवसांपासून सोनं-चांदीच्या सतत घसरण होत आहे. आजही २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २१५० रूपयांची घसरण झाली. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २१५०० रुपयांची घसरण झाली. आज १ किलो चांदी ४००० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं २१५०० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर
Gold Price Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा 24K, 22K आणि 18K चे ताजे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्‍याने होत असलेल्‍या बदलाचा परिणाम सोनं-चांदीच्या बाजारावर होत आहे. यात गेल्‍या आठवड्याच्‍या सुरुवातीपासूनच सोने-चांदीचे भाव कमी होत आहेत. १ सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव १ लाख ५३ हजार ९५० रुपये प्रतिदहा ग्रॅम विनाजीएसटी होता. आज त्यात २१५० रपयांची घसरण हेावून सोनं १ लाख ५१ हजार ८०० रूपयांवर आले आहे. तर १ सप्टेंबरला चांदीचा भाव २ लाख ३५ हजार प्रती किलो विना जीएसटी हेाता. आज त्यात ४००० रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर २ लाख ३१ हजार प्रती किलो झाले आहे.

Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं २१५०० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर
Gold Rate Today : मोठी बातमी! सोन्याच्या दरात आजवरची सर्वात मोठी घसरण; 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com