Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठा बदल! १ तोळ सोने ३३३० रुपयांनी महागलं, जाणून घ्या आजचे ताजे दर

Gold Silver Rate Today Update News : सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५५,३५० रुपयांवर पोहोचला असून २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर जाणून घ्या.
gold rate today news
gold rate today news ai image
Published On
Summary
  • सुवर्ण बाजारात सोन्याच्या दरात उसळी

  • आज १ तोळा सोन्याचे दर ३३३० रुपयांनी वाढले

  • २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १,५५,३५० रुपये झाला

  • अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्डमधील घसरणीचा सोन्याच्या किमतीवर परिणाम

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी नागरिकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरज असेल तरच सोने खरेदी करण्याचे आवाहन केले. दरम्यान, गेल्या चार ते पाच दिवसांपासून घसरणाऱ्या सुवर्ण बाजारात आता तेजी पाहायला मिळत आहे. अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्डमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला असून, दरात सातत्याने वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा १ तोळ्याचा भाव १,५५,३५० रुपयांवर पोहोचला आहे. या दरात तब्बल ३,३३० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १० तोळे सोन्याच्या किमतीत ३३,३०० रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे नागरिकांना घाम फुटला आहे. विशेषतः लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे सोन्याची खरेदी करण्यापूर्वी आजचे २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेटचे ताजे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बाजारातील बदलांनुसार सोन्याच्या किमतीत पुढील काळातही चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

gold rate today news
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १५,५३५

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,२४,२८०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,५५,३५०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १५,५३,५००

gold rate today news
Rain Alert : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी; तुमच्या शहरातील पावसाचा अंदाज काय? वाचा

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,२४०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१३,९२०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४२,४००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,२४,०००

gold rate today news
Karlyacha Juice : डायबिटीजला आता बोला बाय बाय! कारल्याचा ज्यूस दररोज प्यायल्याने 'हे' ६ आजार पळतील दूर

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर ११,६५१

  • ८ ग्रॅम: आजचे दर ९३,२०८

  • १० ग्रॅम: आजचे दर १,१६,५१०

  • १०० ग्रॅम: आजचे दर ११,६५,१००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com