Gold Price Drop Saam Tv
महाराष्ट्र

Gold Price Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा सोनं २०००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Gold Price Drop: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खरेदीची सुवर्णसंधी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोनं खरेदी करण्यापूर्वी वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Priya More
  • जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • २४ कॅरेटच्या १० तोळे सोन्याच्या दरात २०,००० रुपयांची घसरण

  • १ किलो चांदीच्या दरात ७,००० रुपयांची घसरण

  • ग्राहकांसाठी आज सोनं-चांदी खरेदीची चांगली संधी आहे

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला. सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २००० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये ७००० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आज तुम्ही सोनं-चांदी खरेदी केल्यावर तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज जळगावच्या सराफा बाजारामध्ये २४ कॅरेटचे १ तोळा सोन्याचे दर २००० रुपयांनी स्वस्त झालं. आज सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १ लाख ४२ हजार ३०० रूपये मोजावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २०००० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १४ लाख २३ हजार रुपये खर्च करावे लागतील. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये ७००० रुपयांची घसरण झाली आहे. तर आज चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला २ लाख २१ हजार रुपये मोजावे लागतील.

जळगावच्या सराफा बाजारातील सोन्याचे दर किती?

२२ कॅरेट सोनं - १,३०,३५० रुपये

२४ कॅरेट सोनं - १,४२,३०० रुपये

चांदीचे दर किती?

१ किलो चांदी २,२१,००० रुपये

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १६९० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी १,४४,१७० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १५५० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३२,१५० रुपये खर्च करावे लागतील. तर आज चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त होऊन २३५ रुपयांना विकली जाते. तर १ किलोचांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली असून २,३५,००० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांच्या पुतळ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड; काँग्रेससह विरोधक रस्त्यावर

NCP Merger: 'आम्ही कुणासोबतही जाणार नाही'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला शरद पवारांकडून ब्रेक

महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये रंगणार सत्तासंघर्षाचा आखाडा; Gen Zसाठी सत्ताधाऱ्यांचा गेमचेंजर प्लॅन?

Drought Relief: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी 75 हजार मदत? सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचे सहकारी चौकशीच्या फेऱ्यात; वाळू तक्सरीत संजय कटारेंना 5 कोटींचा दंड

SCROLL FOR NEXT