Drought Relief: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी 75 हजार मदत? सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा?

Drought Relief for Farmers Fact-Checked : हाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपयांची मदत जाहीर झाल्याचा मेसेज व्हायरल झालाय. या दाव्यात तथ्य आहे का? जाणून घ्या सरकारने प्रत्यक्षात कोणत्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
Fact Check: Has Maharashtra Government Announced ₹75,000 Per Hectare Drought Aid?
Fact Check: Has Maharashtra Government Announced ₹75,000 Per Hectare Drought Aid?
Published On: 
Summary
  • महाराष्ट्रातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

  • हेक्टरी ₹75 हजार मदत जाहीर केल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकार हेक्टरी 75 हजार रुपयांची मदत करणार आहे असा दावा करण्यात आलाय.सरकारने असा निर्णय घेतल्याचा दावा केल्याचा मेसेज व्हायरल होतोय.पण, खरंच शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झालीय का? या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात)

राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता हेक्टरी 75 हजार मदत जाहीर केल्याचा दावा करण्यात आलाय.सरकारने मदतीची घोषणा केल्याचा दावा केलाय. शेतकऱ्यांनी 1 लाखांच्या मदतीची मागणी केलीय आणि आता सरकारने 75 हजार मदतीची घोषणा केल्याचा दावा केल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच सरकारने अशी घोषणा केलीय का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

महाराष्ट्रात राज्यव्यापी दुष्काळ जाहीर झाला असून सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 75 हजार रुपये मिळणार आहेत.हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय.सध्या राज्यातील शेतकरी संकटात आहे.प्रत्येक शेतकऱ्याला मदतीची गरज आहे.त्यामुळे या व्हायरल मेसेजमागचं सत्य जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.शेतकरी हा अन्नदाता आहे. शेतकरी संकटात असताना त्याला मदत करायला हवी पण,खरंच सरकारने 75 हजार हेक्टरी मदतीची घोषणा केलीय का?की कुणीतरी शेतकऱ्यांची थट्टा करतंय? याची आम्ही सत्यता जाणून घेण्यासाठी सरकारकडून अधिकृत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

Fact Check: Has Maharashtra Government Announced ₹75,000 Per Hectare Drought Aid?
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

दुष्काळी मदत किती करणार याची घोषणा केलेली नाही

हेक्टरी 75 हजार मदत करणार ही अफवा

राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला

शेतकऱ्यांनी व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये.

सरकारने फक्त दुष्काळी तालुक्यांची लिस्ट जारी केलीय.अजून पंचनामे आणि पाहणी दौरे सुरू आहेत.

Fact Check: Has Maharashtra Government Announced ₹75,000 Per Hectare Drought Aid?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; मुख्य परीक्षेची तारीख बदलली

अनेक ठिकाणी पंचनामेही सुरू झालेले नाहीत. त्यानंतर आढावा घेऊन किती मदत करायची हे सरकार ठरवेल. त्यामुळे तुम्ही अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.मदतीच्या नावाने कुणीही पैसे मागितले तर देऊ नका.मेसेज व्हायरल करून शेतकऱ्यांची चेष्टा केली जातेय.आमच्या पडताळणीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 75 हजार मदत जाहीर केल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com